युवकांनी क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन देश आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी सिद्ध व्हावे ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

भारतावर परकियांनी ५०० वर्षे आक्रमणे केली. त्यानंतर इंग्रजांनी वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर हिंदूंच्या हातातील शस्त्रे काढली. अहिंसेच्या नावाखाली गांधीवादी तत्त्वांनी भारतियांच्या मनातून शौर्ययुक्त शस्त्र काढून घेतले आणि बहुसंख्यांक हिंदूंचे खच्चीकरण करून त्यांची फसवणूक केली. Read more »

गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘गुरुपौर्णिमा’ हा शिष्य आणि साधक यांच्या जीवनातील सर्वांत मोठा उत्सव आहे. त्या निमित्ताने आपण तन, मन आणि धन यांचा त्याग अन् गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तसेच या निमित्ताने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे, समाजातील लोकांना ‘ऑनलाईन’ अर्पण करण्यासाठी सांगणे आदी धर्मसेवा करू शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. Read more »

वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १९८५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथम सरकारीकरण झाले. त्या वेळी काही ठराविक हिंदूंनीच त्याला विरोध केला होता. सर्वत्रच्या वारकर्‍यांकडून मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नव्हता. त्या वेळी मंदिर सरकारीकरणाविषयी ‘तो पंढरपूरच्या मंदिराचा विषय आहे. तेथील लोक किंवा वारकरी काय ते पहातील’, अशी हिंदूंची मानसिकता होती. Read more »

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. या भारतविरोधी षड्यंत्राविषयी कुठेही चर्चा झाली नाही, त्यामुळे हिंदूंना वेळीच जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ Read more »

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

देशामध्ये युवकांची संख्या अधिक; मात्र त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण दिले जात नसल्याने त्यांचा वैज्ञानिक शिक्षणाकडे कल आहे. पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धतीत राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान शिकवला जात होता. आता मात्र मुलांना अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चार ओळीत शिकवला जात आहे. Read more »

हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. देशात विविध ठिकाणी दंगली, हत्या, बलात्कार आणि धर्मांतर यांच्या घटना घडत असून त्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. Read more »

गुरु-शिष्य परंपरेद्वारे पुन्हा एकदा धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याची वेळ आली आहे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या गौरवशाली परंपरेमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. धर्माला आलेल्या ग्लानीमुळे जेव्हा राष्ट्र आणि धर्म यांवर संकट आले, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदास स्वामी-छत्रपती शिवाजी महाराज, श्रीरामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा अनेक गुरु-शिष्यांनी अग्रणी भूमिका निभावून धर्मसंस्थापनेचे कार्य केले. Read more »

हिंदु धर्मावरील आक्षेप खोडून काढण्यासाठी प्रत्येक हिंदूने वक्ता-प्रवक्ता होणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदु धर्मावर तथाकथित पुरोगामी, नास्तिकतावादी आणि बुद्धीवादी असे अनेक जण टीका करत आहेत. हिंदु धर्मातील श्रद्धा आणि परंपरा यांवर आक्षेप घेऊन धर्माची अवहेलना करत आहेत. हे रोखण्यासाठी आणि ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी अन् धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूने वक्ता-प्रवक्ता होणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले Read more »

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे. त्यासाठी अधिकाधिक ठिकाणी धर्माचा प्रसार करायला हवा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

युवा साधकांनी प्रत्येक कृती साधना आणि धर्माचरण म्हणून करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकमधील युवा साधकांसाठी पू. रमानंद गौडा यांनी नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३०८ हून अधिक युवा आणि बालसाधकांनी घेतला. या मार्गदर्शनामुळे सर्व युवा साधकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून अधिकाधिक साधना आणि धर्मकार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​