कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सरकारी भूमीवर बांधलेले चर्च उद्ध्वस्त करा ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

 मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् जिल्हाधिकार्‍यांना पुढील ४ आठवड्यांमध्ये सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात  आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे. यासह विभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरोधात कर्तव्यचुकारपणा केल्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आणि त्याच्या आधारे सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचाही आदेश दिला आहे. Read more »

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे ! Read more »

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला आहे. ‘हा निर्णय केवळ मंदिराचे विश्वस्त घेऊ शकतात, सरकार नाही’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुडुचरी येथील ‘कलारीग्राम’ संस्थेसाठी विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी पुडुचेरीमधील ‘कलारीग्राम’ या संस्थेसाठी धर्मशिक्षणविषयक एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे इंग्रजी भाषेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. Read more »

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

जिल्ह्यातील सिरूवाचूर येथील मधुरा कालीअम्मन मंदिराच्या परिसरात असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची हिंदुद्वेष्ट्यांनी तोडफोड केली. भक्तांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. ही घटना ७ ऑक्टोबर या दिवशी घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. Read more »

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘श्री टीव्ही’वर पितृपक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या प्रश्नांना अध्यात्मदृष्ट्या उत्तरे दिली Read more »

तमिळनाडूतील मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी ४ मासांत अतिक्रमणमुक्त !

तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर ही भूमी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश दिला होता. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पतंजलि योग समितीच्या वतीने पितृपक्षानिमित्त २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मार्गदर्शन केले. Read more »

मंदिरांच्या भूमी बळकावणार्‍यांना ‘गुंडा कायद्यां’तर्गत बेड्या ठोका ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

 ज्यांनी राज्यातील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि निर्धारित वेळेच्या आत ते त्या भूमी मंदिरांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका, असा स्पष्ट आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्याच्या ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’ला (‘हिंदु रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोमेंट्स डिपार्टमेंट’ला) दिला. Read more »

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे. या शौचालयांमुळे मंदिराशेजारी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​