नायजेरियन लोकांना देशाबाहेर हाकलून द्या ! – हिंदुत्ववादी संघटनाची मागणी

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरियन लोकांच्या विरोधात दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

ठाणे : अंमली पदार्थांची विक्री करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेणार्‍या, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांचे पारपत्र रहित करून त्यांना देशाबाहेर हाकलून दिव्यातील नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून मुक्त करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने दिवा पूर्व भागात रेल्वे स्थानकाच्या बाहेर १९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदि संघटना, तसेच दिवा येथील नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाला शिवसेना विभाग प्रमुख श्री. काळूराम पाटील, शहर प्रमुख श्री. ब्रह्मशेठ पाटील, माजी विभाग प्रमुख श्री. ज्ञानेश्‍वर यंदारकर, भाजपचे मुंब्रा-दिवा शहर अध्यक्ष श्री. रोहिदास मुंडे आणि श्री. आदेश भगत, भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष श्री. उपेंद्र डहाके, हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतिराम गोंधळी, दिवा व्यापारी संघटनेचे श्री. चेतन पाटील, डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. नितीन भोईर आणि सचिव श्रीमती मंगेशकर, रिपब्लिकन पक्षाचे दिवा अध्यक्ष श्री. एकनाथ भगत, गायत्री परिवाराचे श्री. जयप्रकाश सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अमित अहिरे, श्री. शिवम् सोनी, सनातन संस्थेच्या सौ. वेदीका पालन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी या विषयावर आपले मत मांडून नायजेरीयन लोकांवर कारवाई होत नसल्याविषयी निषेध व्यक्त केला.

नायजेरियन नागरिक हद्दपार केल्याविना शांत बसणार नाही ! – मोतिराम गोंधळी, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती

दिव्यात अनधिकृत इमारती, तसेच चाळीमध्येे दुप्पट किंवा तिप्पट भाडे देऊन या नायजेरियन टोळ्यांनी घरे भाड्याने घेतली आहेत. मुंब्रादेवी वसाहत, डायघर, गणेशनगर, बी.आर्. नगर, साबेगाव, रेल्वेस्थानक परिसर येथे नायजेरियन नागरिक बेकायदेशीरपणे राहत असून रात्री गच्चीवर बसून या मंडळींचे भ्रमणध्वनीवरून व्यवहार होतात. तसेच त्यांच्या आडदांड शरीरयष्टीमुळे गावातील नागरिकही त्यांच्यापासून चार हात लांब राहणे पसंत करतात. अशा वेळी भविष्यात या नागरिकांची दादागिरी वाढणार असल्याचा धोका लक्षात घेऊन नायजेरियन नागरीक हद्दपार होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही.

नायजेरियन नागरिकांना वेळीच आवर घाला ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

मुंबई पोलिसांनी २०१५ या वर्षभरात अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या १७ सहस्र घटना घडल्याची माहिती दिली असून केवळ मुंबई शहरात ३६ नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. आतापर्यंत ९ कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतलेे आहेत. स्थानिक लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी या टोळीतील लोक स्थानिक लोकांची भाषाही शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते स्थानिक महिलांशी विवाहही करतात. यामुळे त्यांना हा व्यवसाय करणे सोपे होत आहे.

नायजेरियन लोकांना वेळीच इमारतींमधून बाहेर काढा ! – श्री. काळूराम पाटील, शिवसेना

नायजेरियन नागरिकांचा तरुण पिढी वाया घालवण्याचा प्रयत्न चालू आहे. दिवा शहरात नायजेरियन नागरिक कुठे रहातात, याची माहिती गोळा करा. त्यांना वेळीच इमारतीतून हाकलून लावण्यासाठी एकत्र या.

क्षणचित्र 

१. आंदोलनाच्या वेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
२. सौ. संगिता पाटील ही महिला आपल्या लहान मुलाला घेऊन आंदोलनात सहभागी झाली आणि संताप व्यक्त करत विषय मांडला.
३. आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनकर्त्यांनी केलेल्या काही मागण्या 

१. हे नायजेरियन नागरिक कोणता व्हिसा घेऊन येथे रहातात, जर व्यवसायाचा व्हिसा असल्यास ते कोणता व्यवसाय करत आहेत आणि जर शिक्षणासाठी आले असतील, तर ते कुठे शिकत आहेत, याची सखोल चौकशी व्हावी.
२. सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन नागरिकांवर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांचा अमली पदार्थांचा व्यवसाय बंद करण्यात यावा.

Related Tags

राष्ट्रीयराष्ट्रीय हिंदु आंदोलनहिंदु जनजागृती समिती

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​