इस्लामिक स्टेटने रचला होता जाळपोळीचा कट

isisनवी देहली : भारतात घातपात घडवण्यासाठी इस्लामिक स्टेटने हालचाली सुरू केल्याची कुणकुण लागलेली असतानाच, त्यांनी रचलेल्या एका कटाचा उलगडा झाला आहे. जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारच्या अटकेनंतर देशभरात झालेल्या आंदोलनांमध्ये शिरून गाड्या जाळा, तेलाचे टँकर पेटवा, असे आदेश त्यांनी भारतातील तरुण दहशतवाद्यांना दिले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयएसची भारतातील शाखा मानल्या जाणाऱ्या ‘जुनुद अल खलिफा-ए-हिंद’ या दहशतवादी संघटनेतील आशिक अहमद (राजा), मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफझल हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू असून, भारतात हातपाय पसरण्यासाठी आयएस काय-काय करतेय, हे जाणून घेण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी, ऐक्याला धक्का देण्यासाठी आयएसनं केलेल्या कारस्थानाचा गौप्यस्फोट या चौकशीतूनच झालाय.

जेएनयू कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमारला झालेल्या अटकेचे पडसाद देशभरात उमटले होते. विविध विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. या निदर्शनांमध्ये शिरून गाड्या जाळण्याचा, तोडफोड करण्याचा आदेश आयएसच्या ‘हायकमांड’कडून मिळाला होता, असे १९ वर्षीय आशिक अहमदने सांगितले. १९ फेब्रुवारीला ‘ट्रिलियन अॅप’द्वारे अहमद अलीने आपल्याला संपर्क साधला होता. तपास संस्थांचे आपल्यावर लक्ष आहे. अशावेळी, विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा फायदा आपण उठवायला हवा, असे त्याने म्हटल्याचे राजाने स्पष्ट केले. अहमद अलीने आपली ओळख ‘अन्सार उद तौहीद बिलाद अल-हिंद’ या संघटनेचे प्रमुख अशी करून दिली होती. परंतु, हा अहमद अली आयएसचा भारतातील म्होरक्या शफी अरमारच असल्याचा संशय एनआयएला आहे.

लपून राहायला, पोहायला आणि नकाशे बनवायला शिका, अशा सूचना आपल्याला देण्यात आल्याचे आशिकने सांगितले. भारतातील शिया समुदायाला लक्ष्य करण्याची आणि यासिन भटकळला तुरुंगाबाहेर काढण्याची आखणी ते करत होते, असेही तो म्हणाला.

आयएसशी संबंधित दहशतवाद्याचा जबाब नोंदवला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स  

Related Tags

अंतरराष्ट्रीयइसिसधर्मांधराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​