आयएसआयएसच्या तीन महिला रिक्रूटर्सची भारतावर नजर

isis

नवी देहली : जहाल दहशतवादी संघटना इस्‍लामिक स्‍टेट (आयएसआयएस) भारताविरोधातील एक मोठा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयएस सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क करून त्यांना दहशतवादी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

आयएसआयएसने या कामासाठी तीन महिलांची नियुक्ती केल्याचीही माहिती मिळाली आहे. भारतात तरुणांना संघटीत करून त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करून घेण्यासाठी करण्‍यात येणार असल्याचे सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे.

१. ‘मेल टुडे’च्या रिपोर्टनुसार, आयएस रिक्रूटर्समध्ये फिलिपाइन्स, अर्जेंटीना व श्रीलंकेतील तीन महिलांचा समावेश आहे.

२. सूत्रांनूसार, फिलिपाइन्सच्या महिला दहशतवादीचे नाव केरन, श्रीलंकेतील महिलेचे नाव एजे आहे तर तिसरी‍ महिला दहशतवादी ही अर्जेंटीनाची राहाणारी असून तिने नाव फातिमा सांगितले जात आहे.

३. आयएसआयएसच्या संपर्कात असलेल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात ४९ जणांना पोलिसांनी अटक केले होते.

४. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २५ जणांना तेलंगणा, महाराष्ट्र, देहली व तमिळनाडूतून अटक केली असून उर्वरित २४ जणांना देशातील वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

५. गुप्तचर संस्था आयएसआयएसच्या रिक्रूटर्सवर लक्ष ठेवून आहे. देशातील आणखी २५ जण या रिक्रूटर्सच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

६. सर्व सोशल मीडियावर सर्क्रीय आहेत. आयएसआयएसमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी वाॅट्सअॅप, फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

७. भारत, श्रीलंकेतील तरुणाईला टार्गेट केले जात आहे.

युवकांना असे अाकर्षित करतात रिक्रूटर्स…

अटक करण्‍यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी चौकशीत सांगितले की,

१. आयएसचे हँडलर्स सोशल मीडियाचा वापर करून भारतीय युवकांना टार्गेट करत आहेत.

२. तिन्ही रिक्रूटर्स महिला युवकांना ग्रुप्समध्ये सहभागी करून घेतात. त्यांना व्हिडिओ लिंक पाठवून त्यांचे ब्रेनवॉश करण्‍यात येते.

३. इतकेच नव्हे तर त्यांना इस्लामिक साहित्य पाठवण्यात येते.

४. मुसलमांनविरोधात जगभरात कट रचला जात आहे. प्रत्येक देशात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे सांगुन युवकांना भडकवले जाते.

५. युवकांना पैशाचे अामिष दाखवले जाते.

संदर्भ : दिव्य मराठी

Related Tags

अंतरराष्ट्रीयइसिसधर्मांधराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​