प्रेमात जिहादला कोणतीही जागा नसल्याचाही दावा !
- राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम !
- प्रतिदिन हिंदु तरुणींची फसवणूक करत प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या घटना उघड होत असतांना त्या गेहलोत यांना दिसत नाहीत का ? अशा घटना रोखण्यासाठी त्यांचे सरकार काय प्रयत्न करत आहे, हे ते का सांगत नाहीत ?
- मुसलमान असतांना हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणे याला गेहलोत प्रेम समजतात का ? जर नाही, तर ते याच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत ?
- केरळमध्ये हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आतंकवादी बनवण्यात आले, त्याविषयी गेहलोत गप्प का ? कि हे त्यांना मान्य आहे, असे हिंदूंनी समजायचे का ?
नवी देहली : देशाला विभागण्यासाठी आणि धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. (‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात आहे’, असे विधान केरळमधील तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन् यांनीच केले होते आणि ते भाजपचे नव्हते, हे गेहलोत कसे काय विसरतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे. हा कायदा न्यायालयातही टिकणार नाही. प्रेमात जिहादला कोणतीही जागा नाही, असे ट्वीट राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या भाजपशासित राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी भाजपवर ही टीका केली आहे.
(सौजन्य : INDIATv)
#lovejihaad को रोकने हेतु कानून बनाना संविधान विरोधी ! – @ashokgehlot51, मुख्यमंत्री, राजस्थान
हिन्दू युवतियों से धोखाधडी कर प्रेमजाल में फंसाने की घटनाएं क्या गेहलोत को दिखाई नहीं देतीं ? ऐसी घटनाएं रोकने हेतु @INCRajasthan1 क्या प्रयास कर रही है, यह वे क्यों नहीं बताते ? pic.twitter.com/TN14osdFLT
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) November 21, 2020
गेहलोत यांनी पुढे म्हटले की,
१. भाजपकडून देशात असे वातावरण सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे, ज्यामध्ये सहमतीने एकत्र येणार्या सज्ञान व्यक्तींनाही सत्तेच्या दयेची याचना करावी लागेल. (येथे सहमतीने एकत्र येणार्या सज्ञान व्यक्तींचा विरोध नाही, तर त्याच्या नावाखाली होणार्या फसवणुकीचा विरोध आहे, हे गेहलोत यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
२. विवाह हा सर्वस्वी खासगी निर्णय आहे आणि हे त्यावरच अंकुश लावू इच्छितात. वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे. (विवाह हा खासगी निर्णय असला, तरी त्यामध्ये कुणाची फसवणूक होत असेल, तर तो गुन्हा आहे, हे गेहलोत यांना ठाऊक नाही का ? कि ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा, सामाजिक तणाव वाढवण्याचा आणि राज्यघटनांमधील तरतुदींचे उल्लंघन करण्याचा हा भाजपचा एक कट दिसत आहे. राज्य कोणत्याही आधारावर नागरिकांसमवेत भेदभाव करत नाही. (धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे सर्वाधिक काम काँग्रेसने गेल्या ७२ वर्षांत केले आहे, तेवढे अन्य कुणीच केले नसेल ! काँग्रेसच्या काळात देहलीमधील शीखविरोधी दंगलीत साडेतीन सहस्र शिखांना ठार करण्यात आले, त्याविषयी गेहलोत का बोलत नाही ? कि त्यांना ही कत्तल धार्मिक सौहार्द वाटते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात