प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !
भोपाळ (मध्यप्रदेश) : राज्यातील भाजप सरकारने गायीच्या संरक्षणासाठी ‘गो मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाष्टमीच्या दिवशी या मंत्रालयाची पहिली बैठक पार पडणार आहे. याअंतर्गत पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभाग या विभागांचाही समावेश करण्यात येणार आहे.
प्रदेश में गोधन संरक्षण व संवर्धन के लिए 'गौकैबिनेट' गठित करने का निर्णय लिया गया है।
पशुपालन, वन, पंचायत व ग्रामीण विकास, राजस्व, गृह और किसान कल्याण विभाग गौ कैबिनेट में शामिल होंगे।
पहली बैठक 22 नवंबर को गोपाष्टमी पर दोपहर 12 बजे गौ अभ्यारण, आगर मालवा में आयोजित की जाएगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 18, 2020
गायींच्या संरक्षणासाठी सर्वच विभाग सामूहिकरित्या यासंदर्भात चर्चा करणार आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात