विदेशातून १ सहस्र कोटी रुपयांच्या देणग्या मिळवल्या !
- अशा चर्चचे सरकारीकरण करण्याचे धाडस सरकार का दाखवत नाही ?
- एरव्ही हिंदु धर्म, संत, संस्कृती, मंदिरे यांच्यासंदर्भात कथित रूपाने काही अयोग्य घडल्याची आवई जरी उठली, तरी त्यावर आकाशपाताळ एक केल्याप्रमाणे ‘ब्रेकिंग न्यूज’ देणारी प्रथितयश (?) प्रसारमाध्यमे आता मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या ! प्रसारमाध्यमांचा हा हिंदुद्वेष जाणा !
कोची (केरळ) : आयकर विभागाने ५ नोव्हेंबर या दिवशी केरळ आणि इतर राज्यांत के. योहान्नन यांच्या ‘बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च’शी संबंधित लोकांची कार्यालये आणि निवासस्थाने यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडी तिरुवल्ला येथे मुख्यालय असलेल्या चर्चने कर चुकवणे आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा (फेमा) याचे उल्लंघन यांविषयी मिळालेल्या माहितीवर आधारित होत्या.
१. तिरुवल्ला येथे चर्चकडून चालवल्या जाणार्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्येही आयकर विभाग झडती घेत आहे. या धाडींचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
२. वर्ष २०१७ मध्ये गृह मंत्रालयाने ‘बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च’ आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ३ स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी स्वीकारण्यास बंदी घातल्यानंतरही बिलिव्हर्स चर्चने विदेशातून पैसे गोळा करण्याचे गुन्हे केले होते. आतापर्यंत चर्चला १८ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक विदेशी निधी मिळाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात