मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी स्वीकारला होता हिंदु धर्म !
आता न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातही लक्ष घालून याविषयी कठोर कायदा करण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, अशीच हिंदूंची आणि राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
प्रयागराज (उत्तरप्रदेश ) : केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणी दिला आहे. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका जोडप्याने आंतरधर्मीय विवाह केला होता. या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. ‘कुटुंबियांना आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापासून रोखा’, अशी मागणी करणारी याचिका जोडप्याने न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देत ही याचिका फेटाळली आणि वरील निर्णय दिला.
एका मुसलमान तरुणीने २९ जून २०२० या दिवशी हिंदु धर्म स्वीकारला होता. ३१ जुलैला तिने हिंदु तरुणासमवेत विवाह केला होता. ‘यावरून केवळ विवाहासाठीच धर्मांतर केल्याचे स्पष्ट होते’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने या संदर्भात नूर जहां बेगम प्रकरणाचा हवाला दिला.
या प्रकरणात विवाह करण्यासाठी धर्मांतर करणे मान्य नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणात हिंदु तरुणीने धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह केला होता आणि न्यायालयाने हे धर्मांतर अवैध ठरवले होते. न्यायालयाने कुराणातील हदीसचा उल्लेख करत म्हटले होते की, इस्लामविषयी माहिती न घेता, त्या धर्मातील तत्त्वे आणि शिकवणूक यांचा अभ्यास न करता धर्मांतर करणे हे इस्लामला मान्य नाही.
‘लव्ह जिहाद’ करणार्यांची ‘राम नाम सत्य’ यात्रा काढली जाईल ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चेतावणी
‘योगी आदित्यनाथ यांनी म्हटले, तसे अन्य हिंदु नेते का बोलत नाहीत ?’ ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठी ते कठोर का होत नाहीत ?’ असे प्रश्न हिंदूंना पडल्यास चुकीचे ते काय ?
देवरिया (उत्तरप्रदेश) : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. त्यानुसार ‘केवळ विवाहासाठी धर्मांतर वैध नाही’, असे न्यायालयाने सांगितले आहे. सरकार लवकरच ‘लव्ह जिहाद’वर अंकुश लावणार आहे. आम्ही त्यासाठी कायदा बनवत आहोत.
(सौजन्य : NDTV)
जे ओळख लपवून आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, ते सुधारले नाहीत, तर त्यांची ‘राम नाम सत्य’ची यात्रा काढण्यात येईल, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका प्रचारसभेत बोलतांना ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात