‘तनिष्क ज्वेलरी’चा आणखी एक हिंदुद्वेष !
- असे आहे, तर हिंदूंनी या दुकानांमध्ये खरेदीसाठी का जावे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येणारच !
- देशात बहुसंख्येने हिंदू रहात असतांना अशा दुकानांमध्ये अल्पसंख्यांकांच्या दृष्टीने बहुसंख्येने दागिने विक्रीस ठेवले जातात, हे लक्षात घ्या ! हिंदू धर्मनिरपेक्ष असल्याने आणि ते कधीही अशा प्रकारची माहिती घेत नसल्याने त्यांच्या माथी अन्य धर्मियांसाठी बनवण्यात आलेले दागिने मारले जातात अन् हिंदूंना त्याची माहिती नसते, हाही एक प्रकारचा ‘जिहाद’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
- हिंदूंच्या दागिन्यांची कलाकुसर बहुतेक सात्त्विक असते आणि त्याचा हिंदूंना आध्यात्मिक लाभ होतो. त्यामुळे हिंदूंनी दागिने घेतांना ते हिंदूंसाठीच बनवलेले आहेत का ? याची निश्चिती करण्यासह त्यांची कलाकुसर सात्त्विक आहे का ? हेही पहायला हवे !
नवी देहली : ‘तनिष्क ज्वेलरी’चा आणखी एक हिंदुद्वेष समोर आला आहे. या ‘ज्वेलरी ब्रँड’मधील दागिन्यांमध्ये मुसलमानांना झुकते माप देण्यात आले आहे, तर हिंदूंना नावासाठी एकही दागिना ठेवण्यात आलेला नाही. तनिष्क ज्वेलरीच्या संकेतस्थळावर जाऊन ‘मुस्लिम’ या नावाने दागिने शोधण्यात आले असता ३५२ प्रकारचे दागिने दिसून येतात, तर ‘हिंदु’ या नावाने शोध घेतला असता एकही दागिना दिसून येत नाही; मात्र मराठी, तमिळ, गुजराती असे शोधल्यावर दागिने दिसून येतात.
खालील लिंकवर याविषयी माहिती पाहता येते
https://www.tanishq.co.in/shop/search-results/availability=include-out-of-stock?q=muslim
https://www.tanishq.co.in/shop/search-results/availability=include-out-of-stock?q=hindu
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात