केरळमधील एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाचा निर्णय
-
इराकमध्ये जाऊन घेतले होते प्रशिक्षण
-
पॅरिसमधील आतंकवादी आक्रमणात सहभाग
-
भारतात घातपात करण्यासाठी जमा केली होती रासायनिक स्फोटके
अशा आतंकवाद्यांना जन्मठेप नव्हे, तर भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे नागरिकांना वाटेल !
कोच्चि (केरळ) : येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) विशेष न्यायालयाने ‘इस्लामिक स्टेट’(आय.एस्.) या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी सुब्हानी हाजा मोइदीन याला जन्मठेप आणि २ लाख १० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्याच्या विरोधात यु.ए.पी.ए. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला वर्ष २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती.
१. मोइदीन हा वर्ष २०१५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणातील आरोपी होता. यातील दुसरा आरोपी सालाह अब्देसलाम याच्या समवेत त्याने प्रशिक्षण घेतले होते. या आक्रमणात एकूण १३० जणांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१८ मध्ये फ्रान्सचे पोलीस त्याचा जबाब नोंदवण्यासाठी भारतात आले होते.
२. एन्.आय.ए.ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वर्ष २०१५ मध्ये मोइदीन तुर्कस्तानच्या मार्गे इराकमध्ये गेला होता. तेथे तो आय.एस्.मध्ये सहभागी झाला होता. तेथे प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला मोसूलमध्ये पाठवण्यात आले होते. तेथे युद्धाच्या वेळी त्याच्या सहकार्यांना ठार होतांना पाहून तो घाबरून परत भारतात आला. नंतरही तो ‘आय.एस्.’च्या सतत संपर्कात होता. त्याने देशात आतंकवादी आक्रमणे करण्यासाठी तमिळनाडूच्या शिवकाशी येथून रासायनिक स्फोटके जमा केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात