अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा ते जामिनावर सुटतील आणि देशात कारवाया करतील !
नवी देहली : दक्षिण भारतातील तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांमधून इस्लामिक स्टेटच्या १२२ आतंकवाद्यांना १७ गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) ही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. या राज्यांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, बंगाल, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये इस्लामिक स्टेट सक्रीय आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. भारताने यापूर्वीच इस्लामिक स्टेट आणि तिच्याशी संबंधित अन्य संघटनांवर बंदी घातली आहे.
रेड्डी म्हणाले की, या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा कसा होतो, याचीही माहिती आहे. तसेच त्यांना आतंकवादी कारवाया करण्यासाठी विदेशातून कसे आदेश दिले जातात आणि साहाय्य केले जाते, याचीही माहिती आहे. हे आतंकवादी इंटरनेटच्या साहाय्याने एकमेकांच्या संपर्कात असतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात