एकता कपूर यांच्या वेब सिरीजमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान

  • अहिल्यादेवी यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर महाराज यांच्याकडून निषेध

  • एकता कपूर यांनी चूक सुधारून क्षमा मागावी !

एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म’कडून यापूर्वीही राष्ट्र आणि धर्म यांचा अवमान करणार्‍या वेब सिरीज बनवण्यात आल्या आहेत; मात्र याविषयी केंद्र सरकारने कोणताही कायदा बनवलेला नसल्याने या मालिकांवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे फावले आहे. आतातरी केंद्र सरकार तातडीने कायदा करून अशा वेब सिरीज आणि त्यांचे निर्माते यांच्यावर कारवाई करणार का ?

इंदूर (मध्यप्रदेश) : ‘झी५’ आणि ‘अल्ट बालाजी’ या ‘अ‍ॅप्स’वर प्रसारित होणार्‍या ‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा विषय मांडण्यात आला आहे. अशा मालिकेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म’ने केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर महाराज यांनी एकता कपूर यांना पत्र पाठवून याविषयी समज देत चूक सुधारून क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या नेत्या निहिराका खोंदले यांनीही याचा विरोध केला आहे. राष्ट्र्रवादी काँग्रेसनेही याची नोंद घेत एकता कपूर यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बबनराव मदने यांनी ‘कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर महाराज यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. अशा प्रकारचे नाव देण्याच्या तुमच्या विकृत मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांच्या नावाचा असा वापर करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?

२. आज तुम्ही ज्या स्वातंत्र्यामध्ये रहात आहात ते स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य अहिल्यादेवी यांच्यासारख्यांच्या बलीदानामुळे झाले आहे. ते तुम्ही विसरला आहात.

३. तुमच्याकडून झालेल्या अवमानामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. एक महिला असून तुम्ही देशाच्या एका महान महिलेचा केलेला अवमान तुम्हाला शोभत नाही. तुम्ही केलेल्या या चुकीसाठी तुम्ही क्षमा मागावी आणि ती चूक सुधारावी, तसेच यापुढे अशी चूक करू नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोध

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​