आतंकवाद्यांशी संबंध असणाऱ्या ‘जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’ची चौकशी करा !

‘मानुषी’ संकेतस्थळाच्या संस्थापिका-संपादिक मधुपूर्णिमा किश्‍वर यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

नवी देहली : आतंकवाद्यांशी संबंध असलेले ‘जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’ वर्ष २००९ पासून यु.पी.एस्.सी.च्या (केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या) परीक्षेस पात्र होण्यास साहाय्य करण्यासाठी ‘जकात’च्या फंडातून इच्छुक मुसलमानांना शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहे. ‘जकात’चे लाभार्थी आता आय.ए.एस्, आय.एफ्.एस्., आय.पी.एस्., आय.आर्.एस्. आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये कार्यरत आहेत. ‘मानुषी’ संकेतस्थळाच्या संस्थापिका-संपादिका मधुपूर्णिमा किश्‍वर यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी यु.पी.एस्.सी. परीक्षेच्या माध्यमातून भारतातील महत्त्वपूर्ण सनदी पदे मिळवण्यासाठी भारतातील ‘जकात’च्या  योजनाबद्ध आणि गुप्तपणे राबवले जाणारे दुष्कृत्य उघड केले आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘जकात’च्या साहाय्याने प्रशासकीय सेवांत सहभागी झालेल्या ११९ अधिकार्‍यांची संपूर्ण सूची जकात ‘फाऊंडेशन ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही सूचीही पंतप्रधानांना पाठवण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की,

१. ‘जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’ कठोरपणे ‘पॅन-इस्लामिक’ (जगभरात इस्लामचा प्रसार) धोरण जोपासत आहे. या संघटनेचे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहेत. भारत सरकारने बंदी घातलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चेही ‘जकात फाऊंडेशन’शी संबंध आहेत.

२. चिंताजनक गोष्ट म्हणजे ‘जकात’ने प्रशिक्षित असलेल्या इच्छुकांची मोठ्या संख्येने यु.पी.एस्.सी.कडून भारतातील अत्युच्य सेवांमध्ये भरती केली गेली आहे. या सेवांतील अधिकार्‍यांना केवळ शासनाची सुरक्षाविषयक गुप्त माहिती आणि त्याचे परिणामच माहीत असतात असे नव्हे, तर ते धोरणनिर्मिती अन् अंमलबजावणीचा एक भागही असतात.

३. डॉ. सय्यद जफर महमूद (माजी भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि ‘जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे संस्थापक अध्यक्ष) हे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये विशेष अधिकारी (ओ.एस्.डी.) म्हणून अल्पसंख्यांकांना सुविधा पुरवण्यात पुढे होते. मुसलमानांंमधील असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सत्य आकडेवारीकडे डोळेझाक करणार्‍या सच्चर समितीचा प्रभारी म्हणून त्यांना नियुक्त केले गेले होते. ते सध्या ‘जकात फाऊंडेशन’चेही अध्यक्ष आहेत.

४. ‘जकात’ची आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे ‘मदीना ट्रस्ट’ जी सप्टेंबर २०१२ मध्ये लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांवरील आक्रमणात सहभागी होती. मदीना ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. जाहिद अली परवेझ हेदेखील ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे विश्‍वस्त आहेत. ‘इस्लामिक फाऊंडेशन’च्या २ विश्‍वस्तांचे संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातलेल्या तालिबान आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांशी संबंधित होते.

५. ‘जकात’च्या म्हणण्यानुसार, संघटनात्मक कार्यक्रम हाती घेतांना शरीयतच्या नियमांचे पालन केले पाहिजे, तेही शरीयत सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनाखाली झाले पाहिजे. ‘हलालो-नोमिक्स’च्या (हलाल प्रमाणपत्राचे आर्थिक साम्राज्याच्या) माध्यमातून इस्लामवादी आता चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाले आहेत. औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि दैनंदिन किराणा सामानांसह जवळजवळ सर्व ग्राहकवस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ कह्यात घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या माध्यमातून कोट्यवधी मुलमानेतर अप्रत्यक्षरित्या त्यांचे पैसे या उपक्रमासाठी देत आहेत.

या सर्व गोष्टींचा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून मधुपौर्णिमा किश्‍वर यांनी पंतप्रधानांना खालील कृती करण्याची विनंती केली आहे –

१. ‘जकात’च्या डॉ. झाकीर नाईक, तालिबान आणि अल् कायदा यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी सखोल चौकशी करावी.

२. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत, ‘जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’शी संबंधित सर्व सरकारी नोकरांना परत बोलवा.

३  यु.पी.एस्.सी.च्या परीक्षेतील ‘जकात फाऊंडेशन’शी जोडलेले प्रत्येक उमेदवार आणि  यशस्वी विद्यार्थी यांचे मूल्यांकन करण्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) निर्देश द्या; तसेच त्यांचे कट्टरवादाचे शिक्षण कितपत झाले आहे ?, हे पडताळून बघावे.

४. आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या‘ जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया’ आणि त्यासंबंधित संघटनांवर श्‍वेतपत्र प्रकाशित करा आणि इस्लामी धोरणाचा पाठपुरावा करणार्‍या अशा संघटनांचे लोकशाही आणि बहुधर्मीय भारतात स्थान आहे कि नाही ? यविषयी स्पष्ट धोरणात्मक निवेदन करा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

भ्रष्टाचारराष्ट्रीयहिंदु विराेधीहिंदूंचे धर्मांतरण

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​