राष्ट्रप्रेमी ‘सुदर्शन टीव्ही’ वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची IAS आणि IPS संघटनांची द्वेषमूलक मागणी

‘सुदर्शन टीव्ही’वर प्रसारित करण्यात येणार असलेला ‘नोकरशाहीत जिहाद’ नावाचा कार्यक्रम ‘प्रक्षोभक’ असल्याचा दावा

देशात अनेक ‘जिहाद’ चालू आहेत, असे दिसून येत असतांना त्याचा कधी आय.पी.एस्. आणि आय.ए.एस्. संघटनांनी विरोध केला आहे का ? देशाचे  प्रशासन कह्यात ठेवणारे आय.पी.एस्. आणि आय.ए.एस्. अधिकारी कधी याविषयी बोलतात का ?

नवी देहली : ‘सुदर्शन टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये मुसलमानांची ‘घुसखोरी’ आणि सरकारच्या ‘नोकरशाहीत जिहाद’ कसा चालू आहे, यावर बघा रिपोर्ट’ अशा आशयाचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यावरून ‘सुदर्शन टीव्ही’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांचा प्रशासकीय सेवेतील अनेक सनदी अधिकारी आणि आय.पी.एस्. असोसिएशन यांनी निषेध केला आहे. तसेच सुरेश चव्हाणके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अधिकार्‍यांनी केली आहे. (कार्यक्रम प्रसारित होण्यापूर्वीच त्याला विरोध होतो, हा पूर्वग्रहातून निर्माण झालेला द्वेष आहे, असेच म्हणायला हवे ! शाह फैसल हे काश्मिरी आय.ए.एस्. अधिकारी थेट फुटीरतावाद्यांचे समर्थन करायचे. हे अन्य आय.ए.एस्. अधिकार्‍यांना चालायचे का ? त्या वेळी कधी आय.ए.एस्. किंवा आय.पी.एस्. अधिकार्‍यांनी त्याला विरोध का केला नाही ? अशी असंख्य उदाहरणे आहेत. प्रशासनातील अशा राष्ट्रघातकी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘सुदर्शन टीव्ही’वर दाखवला जाणारा हा रिपोर्ट द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक आहे. तसेच घटनात्मक संस्था असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगावर (यु.पी.एस्.सी.यावर) प्रश्न उपस्थित करणारा आहे’, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ‘चव्हाणके यांचा हा रिपोर्ट निषेधार्ह असून धार्मिक आणि दायित्वशून्य पत्रकारितेचे ठसठसीत उदाहरण आहे’, असे आय.पी.एस्. असोसिएशनने म्हटले आहे. यासंदर्भात असोसिएशनने ट्वीट केले आहे. (राष्ट्रहिताच्या अनुषंगाने सरकार किंवा प्रशासन यांतील चुका किंवा त्रुटी दाखवणे, ही दायित्वशून्य पत्रकारिता कशी ? अशा वृत्तवाहिनीच्या विरोधात कारवाईची मागणी करणे, हे दायित्वशून्य वर्तन आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. ‘केंद्रीय लोकसेवांमध्ये मुसलमानांनी कशी ‘घुसखोरी’ केली. आय.ए.एस्. आणि आय.पी.एस्. यांमध्ये मुसलमानांची संख्या अचानक कशी वाढली ? अतिशय अवघड परीक्षांमध्येही त्यांना सर्वाधिक गुण कसे मिळाले ? ते ‘रँक’वर कसे आले ? काय आहे या मागचे गुपित ? बघा हा रिपोर्ट,’, असे सांगणारा ‘नोकरशाहीत जिहाद’ संबंधीचा रिपोर्ट पाहा’ असा व्हिडिओ चव्हाणके यांनी ट्वीट केला.

२. ‘सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटी’ने कडक कारवाई करावी’, अशी मागणी ‘इंडियन पोलीस फाऊंडेशन’ने केली आहे. ‘अल्पसंख्यांकांच्या विरोधी आणि विषारी भाष्य करणारा हा व्हिडिओ रिट्वीट करू नये. तसेच उत्तरप्रदेश पोलीस आणि न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटी यांनी यावर कडक कारवाई करावी’, अशी मागणी ‘भारतीय पोलीस फाऊंडेशन’ने ट्वीट करून केली आहे. (भारतात अनेक ठिकाणी अल्पसंख्यांकांनी पोलिसांवर आक्रमण केले, एवढेच काय, तर मुंबई दंगलीच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग केला. अशा वेळी पोलिसांच्या संघटनेने काय दिवे लावले ? त्यामुळे या संघटनेच्या हेतूविषयी जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित राहिल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

देहली उच्च न्यायालयाकडून ‘नोकरशाहीत जिहाद’ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाला स्थगिती

देहली उच्च न्यायालयाने सुदर्शन टीव्हीवरील ‘नोकरशाहीत जिहाद’ या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाला स्थगिती दिली आहे. देहलीतील जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. (धर्मांधांकडून सत्य दडपण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनधर्मांधपोलीसराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​