सुशांतसिंह राजपूत मृत्यूचे प्रकरण आणि चित्रपटसृष्टीतील हिंदुद्वेष !

‘वर्ष १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. तेव्हा दंगली करून लक्षावधी हिंदूंची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. सहस्रो हिंदु स्त्रिया आणि मुली यांची अब्रू लुटण्यात आली. पाकिस्तानमधील हिंदूंच्या यातनांना पारावार राहिला नाही. त्यांची अब्जावधी रुपयांची संपत्ती आणि अब्रूही गेली; केवळ जीव वाचवण्यासाठी ते भारतात आले. चित्रपटामध्ये काम करणार्‍या तथाकथित शांतीप्रिय (?) मुसलमान समाजातील कलावंतांनी हिंदु नावे धारण केली. असे हिंदु नावे धारण केलेले आज अजित, रणजीत, दिलीपकुमार, मधुबाला, मीनाकुमारी आदी नावांनी प्रचलित आहेत. त्यांनी हिंदु नाव धारण केले; कारण पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, देव आनंद, राजकुमार, राजेंद्रकुमार असे हिंदू नायक त्या वेळी होते. संगीतकार, गीतकार, पटकथा लेखक यांमध्ये या तथाकथित शांतीप्रिय समाजाने प्रवेश केला आणि तेथून पुढे जाणीवपूर्वक हिंदूंना तुच्छ दाखवून तथाकथित शांतीप्रिय समाजाचे उदात्तीकरण करण्यात आले. शेकडो वर्षांचा हिंदूंचा इतिहास पाहिला, तर हिंदूंनी धर्म, जात, पंथ यावरून कुणाला त्रास दिला नाही अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसलमान आणि ख्रिस्ती येथे दिसले नसते. आज तर अनेक राज्यांमध्ये हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत.

१. चित्रपटांमधून करण्यात आलेला हिंदूंचा अपमान !

१९७० च्या दशकामध्ये करीम लाला, हाजी मस्तान या तस्करांवर आणि गुंडांवर चित्रपट निघाले. वास्तविक ते तस्करी करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करत होते; परंतु चित्रपटात त्यांना जाणीवपूर्वक सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न विविध माध्यमांमध्ये असलेल्या तथाकथित शांतीप्रिय समाजाने केला. येथे त्यांनी कला सादर करण्याऐवजी त्यांचा रंग दाखवायला प्रारंभ केला. या काळात नायक आणि नायिका हिंदु असल्या, तरी त्यांच्या दंडावर जाणीवपूर्वक ‘७८६’ क्रमांकाचा बिल्ला लावला गेला. धर्मांध नायक एका चित्रपटात आईच्या इच्छेपोटी मंदिरात गेलेला दाखवला जातो, तरी पटकथेत सांगितल्याप्रमाणे तो दर्शन घेत नाही किंवा प्रसादही ग्रहण करत नाही. एका चित्रपटात तथाकथित शांतीप्रिय व्यक्तीला अपंग असतांनाही पोलिसांना साहाय्य करत असल्याचे दाखवण्यात आले आणि त्याच्या तोंडी ‘या अली मैं सबकी खबर रखता हूं’, हे गाणे देण्यात आले अन् त्याची भूमिका लक्षात राहील, असा प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक करण्यात आला. दुसरीकडे हिंदु धर्मगुरु, पुरोहित, गुरुजी, संन्यासी हे सर्व लंपट, लालची, कामपिपासू आणि स्वार्थी दाखवले गेले. त्यांना अपमानित करण्यात आले. त्या काळात कथाकार, गीतकार आणि आणि संगीत दिग्दर्शक कोण होते ? हे लक्षात घेतले, तर याचे उत्तर मिळते.

२. मुंंबई बॉम्बस्फोट आणि देशभरातील बॉम्बस्फोट यांचा संबंध !

दाऊद नावाच्या तस्कराने ‘लव्ह जिहाद’ला प्रारंभ केला. चित्रपटांमध्ये  धर्मांध नायक आणि हिंदु नायिका यांचे प्रेम जाणीवपूर्वक दाखवले. वर्ष १९९२ मध्ये ४५० वर्षे गुलामीचे प्रतीक असलेली बाबरी पडली. त्याचा सूड म्हणून भीषण दंगली घडवण्यात आल्या आणि गुंडांना हाताशी धरून भीषण असे बॉम्बस्फोट मुंबईतील विविध भागांमध्ये करण्यात आले. यात २५७ निरपराध माणसे हकनाक मेली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली. यासाठी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईची निवड केली. सगळे जाणीवपूर्वक करण्यात आले होते. त्यातून पुढे देशभरात अन्यत्र धर्मांधांनी बॉम्बस्फोट घडवले.

३. …अन्यथा दिशा सालियन आणि सुशांतसिंह जिवंत दिसले असते !

स्वार्थी राजकारण्याच्या साहाय्याने देशद्रोही दाऊदने दुबईला पलायन केले. त्यानंतर मुंबईवर एक आतंकवादी आक्रमण झाले. याचे अन्वेषण करतांना एका नायकाचा स्फोटके आणि बंदूक मुंबईत आणण्यात सहभाग असल्याचे उघड झाले. तेव्हा चित्रपटसृष्टीतील निर्ल्लज कलावंत ‘..बाबा, वुई आर वुईथ यू’ (..बाबा, आम्ही तुझ्यासमवेत आहोत), असे म्हणत त्याला समर्थन देत होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने या क्षेत्रातील कलावंतांनी दाऊदला भेटणे, त्याच्या वाढदिवसाला जाऊन गाणी म्हणणे, नृत्य करणे, हे सगळे निंदनीय प्रकार चित्रपटसृष्टीने आम्हाला दाखवले. यांच्या मुसक्या त्याच वेळी आवळल्या असत्या, तर आज दिशा सालियन आणि सुशांतसिंह जिवंत दिसले असते.

४. केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी खानावळींचे करण्यात आलेले उदात्तीकरण !

पुढील काळात खानावळीचा उदय झाला आणि या खानावळीने ‘लव्ह जिहाद’ त्यांच्या भूमिकेतून प्रत्यक्षात उतरवला. यांचे प्राबल्य एवढे वाढले की, सर्व सरकारी जाहिरातींमध्ये यांचेच तोंडवळे दिसले. यांपैकी एकाने सुसाट गाडी चालवून गरिबांचे बळी घेतले. काळवीट, हरिण यांच्या हत्या छंद म्हणून केल्या, तरी जन्महिंदूंना त्याचे दु:ख झाले नाही. कोर्टकचेर्‍या मात्र बिष्णोई समाजाला आणि करणी सेनेला भोगाव्या लागल्या. ‘किंग इज खान’, असे चित्रपट जाणीवपूर्वक काढण्यात आले. देशप्रेमी, धर्मप्रेमी यांनी याला विरोध केला; म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जाचाला तोंड द्यावे लागले. काळवीटाच्या हत्येत सहभागी असतांनाही एकाला ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले. केवळ धर्मांधांची मते, लांगूलचालन यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आला. पाकिस्तान या शत्रूराष्ट्राचा ‘निशाण-ए-पाकिस्तान’, हा पुरस्कार सर्व स्तरांतून विरोध होत असतांनाही या मंडळीनी घेतला. यांची मग्रुरी एवढी वाढली की, अनेक गुणी कलावंतांना डावलण्यात आले. जे कलावंत ऐकत नाहीत, त्यांचे चित्रपट उशिरा प्रदर्शित करायला सांगण्यात आले, म्हणजे ‘त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी व्हावी’, हा हेतू होता.

५. दिशा सालियनच्या मृत्यूचे अन्वेषण झाले असते, तर सुशांत वाचला असता !

वर्ष २०१४ च्या मे मासातील लोकसभा निवडणुकांचे चटके यांना बसण्यास प्रारंभ झाला. मग एकाची पत्नी म्हणाली, ‘‘मला हिंदुस्थानात रहायची भीती वाटते !’’ हिचा पती मात्र निर्लज्जपणे तुर्कीच्या (तुर्कस्तानच्या) अध्यक्षांच्या पत्नीला भेटतो, जिने ‘काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानची भूमिका योग्य आहे’, असे म्हटले. दुसरा म्हणतो, ‘देशात सहिष्णुता संपली.’ या कलावंतांना जे पुरस्कार यांचा धर्म बघून आणि लायकी नसतांना मिळाले होते, ते परत करण्याची टूमही निघाली. त्यांच्या या गोष्टींना विरोध करणारे कलावंतही होते. त्यांची मात्र पुष्कळ हानी करण्यात आली. सुशांतसिंह याचे नाव येथे नमूद करता येईल. सर्व प्रथम त्याची माजी स्वीय सचिव दिशा सालीयन हिने आत्महत्या केली. तेव्हाच व्यवस्थित अन्वेषण झाले असते, तर सुशांत वाचला असता. सुशांतचा मृत्यू झाला, त्यानंतरच सर्व गोंधळ झाला. बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर बिहार पोलीस मुंबईत अन्वेषणाला आले असता, कोरोनाचे कारण देत त्यांचेच ‘अलगीकरण’ करणे इत्यादी गोष्टी घडल्या. मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ याप्रमाणे ‘अन्वेषण सीबीआयला द्यावे’, हा आदेश देण्यात आला. येथे आता ध्रुवीकरणाला प्रारंभ झाला. या सर्व गोष्टींना अभिनेत्री कंगना रणौत विरोध करत होती, तिच्या प्रयत्नाला यश मिळाले. येथे भाजप खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचाही उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी ‘सुशांतसिंह प्रकरणा’चे अन्वेषण ‘सीबीआय’ला देण्याची मागणी केली होती. त्रिकालज्ञानी संत, द्रष्टे संत सांगतात, त्याप्रमाणे आधी धर्म-अधर्म असे ध्रुवीकरण आणि नंतर शुद्धीकरण होणार. चित्रपटसृष्टीमध्ये याला प्रारंभ झाला आहे; म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महत्त्व आहे.

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाच, आता पुढे शिक्षा किती ?

‘सर्वोच्च न्यायालयामध्ये मागील काही वर्षांत आपण मूठभर लोकांचे प्राबल्य पहात आहोत. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांसाठी सरदार सरोवराच्या संदर्भात वारंवार याचिका करणारे, गुजरात दंगली किंवा सोहराब चकमकीविषयी याचिका करणारे किंवा नक्षलींना जामीन मिळावा; म्हणून न्यायालयाचे दार ठोठावणारे यांचे धाडस एवढे वाढत गेले की, त्यांनी थेट सरन्यायाधीश आणि न्यायसंस्थेलाच वेठीस धरण्यास प्रारंभ केला. वर्ष २००९ च्या सरन्यायाधिशांवर केलेली टीका असो किंवा आता जाणीवपूर्वक सरन्यायाधिशांची केलेली मानहानी असो, यात सुनावणीच्या वेळी ज्या उपटसुंभांचा संबंध नाही, त्यांनी न्यायसंस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला; पण तो विफल ठरला. या वेळी मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण दिसले. अनेक ज्येष्ठ पत्रकार, भूतपूर्व न्यायमूर्ती यांनी न्यायसंस्था आणि निवडणूक आयोग यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याने मूठभर लोकांना नियंत्रणात आणावे, यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. तसेच विविध क्षेत्रांतील ७०० मान्यवरांनी सरन्यायाधिशांना पत्र लिहून पाठिंबा दर्शवला. ‘महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल’ने सरन्यायाधिशांना पत्र लिहून कळवले की, १ लाख ७० सहस्र अधिवक्ते सदस्य असलेली संस्था आपल्या पाठीशी आहे ! हे ध्रुवीकरण आवश्यक आहे. येथेही धर्म-अधर्माची लढाई आहे. न्यायसंस्थेचा वापर केवळ आपल्या दंडेलशाहीसाठी कि न्याय देण्यासाठी ? याचा निर्णय पुढील काळात मिळेल; परंतु धर्मप्रेमींसाठी हा पालट आनंददायी आहे. ‘यतो धर्मस्ततो जयः ।’

श्रीकृष्णार्पणमस्तु !’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related Tags

बहुचर्चित विषयराष्ट्रीयहिंदु विधिज्ञ परिषदहिंदु विराेधीहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​