पुन्हा इसिस !

देहलीतून इसिसच्या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे, तर सीमेपलीकडून घुसखोरी करणार्‍या ५ जणांनाही सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार केले आहे. आतंकवादी कारवाया भारताला नव्या नसल्या, तरी ‘आताच्या स्थितीतही आतंकवादी कार्यरत आहेत’, हे चिंतेचे आहे. तो कुणी बाहेरचा नव्हता, तर मूळ उत्तरप्रदेशातील होता. अबू युसुफ खान हे त्याचे नाव आहे. त्याचा देहलीतील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला गेला असला, तरी तो कोणत्या टप्प्याला जाऊन उघड झाला, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. अबू युसुफ खान याला कह्यात घेतले, तेव्हा त्याने विस्फोटके ‘प्रेशर कुकर’मध्ये ठेवून आक्रमणाची पूर्ण सिद्धता केली होती. त्याच्याकडे १५ किलो स्फोटकांसह अन्यही शस्त्रास्त्रे होती. ‘देहलीतील त्या परिसराचे त्याने पूर्वीच निरीक्षण करून आक्रमणाचा कट रचला’, असे समोर आले आहे. सध्या अनेक राज्यांत आणि अनेक जिल्ह्यांत कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. असे असतांना आतंकवाद्यांचे दळणवळण बिनबोभाट चालू आहे. ते देहलीसारख्या देशातील राजधानीत येऊन निरीक्षण इत्यादी करतात, आक्रमणाची सिद्धता करतात, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना मोठे आव्हान आहे. वेळीच अटक झाली नसती, तर आज देहलीतील चित्र वेगळे असले असते. अयोध्येत झालेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याला विरोध दर्शवण्यासाठी खान देहली आणि उत्तरप्रदेश या राज्यांत आतंकवादी आक्रमणे करणार होता. राममंदिराच्या संदर्भात मुसलमानांच्या भावना सर्वांना ठाऊक आहेत. भूमीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवरही बराच विरोध सहन करावा लागला होता. त्या वेळी अशा धर्मांधतेला खत-पाणी घालणारी भडकाऊ विधाने केली गेली. त्याचे प्रत्यंतर आज दिसत आहे.

आतंकवाद्यांचे विदेशातील जाळे

आतंकवादी अबू खान याला अफगाणिस्तानहून सूचना मिळत होत्या, तसेच तो काश्मीरमधील आतंकवाद्यांच्याही संपर्कात होता. थोडक्यात त्याची संपर्कयंत्रणा मोठी आहे. उत्तरप्रदेश आणि देहलीसारख्या ठिकाणी तो एकटा नक्कीच आक्रमण करू शकत नाही. भारतात राहून अफगाणिस्तानच्या म्होरक्याच्या इशार्‍यांवर कोण देशविघातक कारवाया करत आहेत ? गेली अनेक वर्षे भारतात इसिसच्या कारवाया चालू आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे समर्थक पकडले गेले. जून मासातच मूळची पुण्याची असलेली आणि शिक्षणाच्या नावाखाली काश्मीर घाटीत आतंकवादी कारवाया करणारी सादिया शेख हिला इसिसच्या आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इसिसच्या आतंकवादी हिना बशीर आणि जहानजेब सामी यांच्यासह देहलीतील तिहार कारागृहात असलेल्या आतंकवाद्यांच्याही सादिया शेख संपर्कात होती. तिला पोलिसांनी यापूर्वीही आतंकवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या संशयावरून पकडले होते. प्रत्येक वेळी तिला सोडून देण्यात आले. अशाच प्रकारे देशभरातून अनेक इसिस समर्थकांना, आतंकवाद्यांना अटक केली जाते; मात्र त्या प्रकरणांचे पुढील अन्वेषण काय झाले, दोषींना शिक्षा झाली का, याविषयी काहीही माहिती सामान्यांना दिली जात नाही.

अंतर्गत आतंकवाद

माजी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्या वेळी विधान केले होते की, ‘इसिसचा भारतीय मुसलमानांवर कोणताही परिणाम होणार नाही.’ वास्तविक चित्र मात्र त्याच्या विपरीत आहे. शिवाय एक मोठे आव्हान हे आहे की, ‘आतंकवाद्यांचे समुपदेशन करावे’, असे घातक धोरण आपण स्वीकारले आहे. त्यामुळेच सादिया खानसारख्या आतंकवादी पकडल्या जाऊनही त्यांचे कथित ‘समुपदेशन’ केले जाते अन् त्या पुन्हा आतंकवादी कारवाया करण्यासाठी सिद्ध होतात. आता ज्या देशांत इसिसने सर्वाधिक अत्याचार केले, त्या सिरियामध्ये इसिसच्या कारवाया झाल्याचे कोणतेही वृत्त येत नाही; मात्र भारतात प्रत्येक काही मासांनी इसिसचे आतंकवादी सापडतात. हे सर्व थांबवायचे असेल, तर समुपदेशन नाही, तर धडक कारवाई आवश्यक आहे. त्या वेळी अमेरिकेसारख्या देशाने इसिसच्या क्रूरतेचा कडवा प्रतिकार केला; मात्र त्या देशांत इसिसचा प्रभाव अल्प झाला आहे. भारतात मात्र ‘समुपदेशन’ केले जाते, आतंकवादाचा रंग ठरवून त्यावरून सहानुभूती मिळवली जाते. त्यामुळेच भारतातील आतंकवादाची समस्या सुटत नाही.

‘कलम ३७० हटवणे हा आतंकवाद रोखण्यातील महत्त्वाचा टप्पा होता’, असे अनेकदा सांगितले जाते. त्याने भविष्यात काश्मीर खोर्‍यात शांतता नांदेल, हे खरे आहे. असे असले, तरी गेल्या काही वर्षांत आतंकवादाची पाळेभुळे भारतभर रुजली आहेत. केरळ हा आतंकवाद्यांचा गड झाला आहे. तमिळनाडू, कर्नाटकचे काही जिल्हे, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये आतंकवाद्यांनी त्यांचे जाळे विणले आहे. ते नष्ट करण्यासाठी सीमेपलीकडचा आतंकवाद थांबण्यासाठी प्रत्यक्ष प्रभावी उपाययोजनांची अजूनही प्रतीक्षाच आहे. तरीही ‘उपाययोजना करायला हव्यात’, याची आपल्याला किमान जाणीव तरी आहे. अंतर्गत रुजलेला आतंकवाद निपटणे, हा या लढाईतील महत्त्वाचा टप्पा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादाविषयीच्या अहवालात ‘भारतातील कर्नाटक आणि केरळ या राज्यांत इसिसचे २०० आतंकवादी कार्यरत आहेत’, अशी माहिती आहे. या सर्वांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी धडक कृती करण्याची मानसिकता हवी. एक आतंकवादी आक्रमण उधळून लावले, याचा आनंद सीमित आहे. भारतातील आतंकवाद्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करून देश आतंकवादमुक्त करणे, हेच आपले ध्येय असायला हवे. सुरक्षित जीवन ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. भयमुक्त वातावरणात जगणे, हा आपला हक्कच आहे. त्यासाठी बाह्य आतंकवादासह अंतर्गत आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता आणि त्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम स्वीकारण्यासाठी जनतेने प्रशासनावर दबाव आणावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

इसिसधर्मांधराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​