- अल्पसंख्यांक अल्पशिक्षित असल्याने ते आतंकवादाकडे वळतात, असे म्हणणारे आता याविषयी काहीच बोलणार नाहीत !
- अशा उच्चशिक्षित धर्मांधामुळे जनता कोणत्याही अल्पसंख्यांकांवर कधीतरी विश्वास ठेवू शकेल का ?
बेंगळुरू (कर्नाटक) : इस्लामिक स्टेटच्या खुरासान गटासाठी कार्यरत असणार्या डॉ. अब्दूर रहमान या २८ वर्षीय नेत्रतज्ञाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बेंगळुरूतून अटक केली. तो येथील एम्.एस्. रामय्य रुग्णालयात काम करतो. डॉ. अब्दूर वर्ष २०१४ मध्ये सिरीयामध्येही जाऊन आला आहे. तेथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या उपचारांसाठी तो १० दिवस राहिला होता. सध्या तो इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या साहाय्यासाठी ‘मेडिकल अॅप’ बनवत होता. या प्रकरणी एन्.आय.ए.ने पुणे येथून २२ वर्षांच्या सादिया अन्वर शेख हिलाही अटक केली आहे.
अमेरिकेकडून दावा करण्यात आला होता की, वर्ष २०१८ मध्ये खुरासान गटाने भारतात आत्मघाती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. इस्लामिक स्टेटच्या जगभरात २० शाखा काम करत आहेत. यांतील काही जण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यात ड्रोनचाही समावेश आहे. या गटाने न्यूयॉर्कवर आक्रमण करण्याचा कट रचला होता. वर्ष २०१७ मध्ये या गटाने युरोपमधील स्विडनच्या स्टॉकहोम शहरामध्ये केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात