बेंगळुरू येथील धर्मांध दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करा : हिंदु विधीज्ञ परिषदेची कर्नाटक शासनाकडे मागणी

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी हानीभरपाई वसूल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी याविषयी जलद गतीने पावले उचलून ती वसूल करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !

बेंगळुरू : येथे ११ ऑगस्ट या दिवशी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणावरून धर्मांधांनी केलेल्या दंगलीमध्ये ६० पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले, तर कोट्यवधी रुपयांच्या शासकीय आणि खासगी संपत्तीची हानी झाली. या दंगलीस उत्तरदायी असणार्‍या दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करा आणि त्यांच्यावर ‘अवैध कृती प्रतिबंधक कायद्यां’तर्गत (यु.ए.पी.ए.अंतर्गत) खटले भरा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने कर्नाटक शासनाकडे केली आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. बेंगळुरूच्या या दुर्दैवी; परंतु नियोजित दंगलीमुळे ८ वर्षांपूर्वी, म्हणजेच ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या दंगलीची आठवण येते. त्या दंगलीत महिला पोलिसांचा विनयभंग झाला, ‘मीडिया व्हॅन’ जाळण्यात आल्या, पोलिसांना मारहाण झाली, हुतात्मा स्मारकाची तोडफोड करण्यात आली आदी अनेक घटना घडल्या. आमच्या संघटनेच्या सदस्यांनी दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करण्यासाठी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेनंतर हानीभरपाई वसूल करण्याची प्रक्रिया चालू केली गेली.

२. बेंगळुरूमध्ये २ पोलीस ठाण्यासह काँग्रेसच्या आमदारांच्या घराला आग लावणे, पोलिसांच्या ३ गाड्या जाळणे, सामान्य नागरिकांची ३०० हून अधिक वाहने जाळणे, अशा हानीकारक घटना घडल्या आहेत. ही अचानक आणि उत्स्फूर्त दंगल नाही. ते एक पूर्वनियोजित आक्रमण होते, असा आमचा दावा आहे. राज्याच्या महसूलमंत्र्यांनीही माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेल्या माहितीत असेच म्हटले असून विशेषतः गृहमंत्र्यांनी स्वतःच एका वृत्तपत्रात असेच विधान केले आहे.

३. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि पोलीस अधिकारी हे या दंगलखोरांना सहज ओळखू शकतात; म्हणूनच या पत्राद्वारे आम्ही आपल्याला इतर कायदेशीर गोष्टींसह पुढील गोष्टींवर त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन करतो.

अ. कर्नाटक पोलीस कायदा १९६३ चे कलम ५ अंतर्गत आवश्यक कारवाई करत दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करून तिचे पीडितांना वितरण करावे.

आ. ‘अवैध कृती प्रतिबंधक कायदा (यु.ए.पी.ए.)’ आणि ‘मकोका’ यांसारख्या विशेष कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवावेत.

इ . देहली आणि मुंबई येथे झालेल्या दंगलींप्रमाणेच बेंगळुरू येथेही पूर्वनियोजित दंगल झाली का ?, हे शोधण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) स्थापना करावी.

ई. आर्थिक पैलूंचा शोध घेणे, म्हणजे अशा दंगलींसाठी अर्थपुरवठा झाला असल्यास त्यानुसार आवश्यक कारवाई करावी.

उ. दंगलखोरांना अटक करणे आणि त्यांना कारागृहात टाकणे हे सरकार, गृह विभाग आणि पोलीस यांचे कर्तव्य आहेच; परंतु शासनाच्या बाजूने गंभीर पावले उचलत आरोपींना जामीन मिळू नये आणि खटला योग्य रितीने चालवण्यात यावा, यासाठी प्रयत्न करावेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु विधिज्ञ परिषद

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​