‘सडक २’ चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याने त्याच्यावर कारवाई करावी ! – विहिंप

  • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांना केंद्रीय परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्र देतेच कसे ? भाजप सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, हे पहायला हवे, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन होत असतांना त्यावर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणांनी हे स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

नवी देहली : हिंदी चित्रपट ‘सडक २’चा ‘ट्रेलर’ (झलक) नुकताच प्रसारित झाला. तो पाहून विश्‍व हिंदु परिषदेने तो हिंदूविरोधी असून त्यात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे  सांगितले आहे. तसेच ‘या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. हा चित्रपट ‘ऑनलाईन’ प्रसारित होणार आहे.

विहिंपचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या ट्रेलरचा विरोध केला. तसेच त्यांनी या चित्रपटातून घराणेशाहीचेही समर्थन करण्यात आले आहे. यामुळे या चित्रपटावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही केली.

चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये संत-महंतांचे विडंबन !

या ट्रेलरमध्ये चित्रपटाची नायिका ‘फेक’ गुरूंमुळे माझे आयुष्य’ उद्ध्वस्त झाले’, असे सांगतांना दिसत आहे, तसेच चित्रपटातील खलनायक हा एक साधू वेशातील अत्याचारी बाबा दाखवण्यात आला आहे. ‘चित्रपटात हिंदूंच्याच संत-महंतांना खलनायक का दाखवण्यात आले आहे ? कधी पाद्री किंवा मौलवी यांना खलनायक का दाखवण्यात येत नाही’, असा प्रश्‍न हिंदूंनी उपस्थित केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु धर्महिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्ष

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​