बंगालमध्ये भर बाजारात भाजपच्या आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला !

  • आमदाराची हत्या झाली असल्याचा भाजपचा आरोप

  • कुटुंबियांकडून चौकशीची मागणी

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यापूर्वीच बिघडलेली आहे. आतापर्यंत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या येथे संशयास्पदरित्या हत्या झालेल्या आहेत आणि आताही आमदाराचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला आहे. हे पहाता केंद्र सरकारने आता आणखी हत्या होण्याची वाट न पहाता बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !

उत्तर दिनाजपूर (बंगाल) – भाजपचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह येथील बाजारात एका दुकानाच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना घडली. रे यांच्या घरापासून १ कि.मी. अंतरावर हा मृतदेह आढळून आला. रे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार काही लोक मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास रे यांच्या घरी आले आणि रे यांना त्यांच्यासमवेत घेऊन गेले. रे यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर भाजपने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीस सध्या या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

१. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘अत्यंत अमानुषपणे देवेंद्र नाथ रे यांची करण्यात आलेली हत्या धक्कादायक आहे. यावरून ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील कायदा सुव्यस्था ढिसाळ असल्याचे स्पष्ट होते.’ (आतापर्यंत बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. हे पहाता भाजपने त्यांच्या कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या रक्षणासाठी कृती करणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. वर्ष २०१६ मध्ये देवेंद्र नाथ रे यांनी अनुसूचित जातीसाठी असलेल्या राखीव जागेवरून माकपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Related Tags

बहुचर्चित विषयभाजपाराष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​