-
पोलिसांवरही धर्मांधांची अरेरावी : पोलिसांच्या नोटिसीनंतरही मोठ्या आवाजात भोंगा चालूच !
-
पोलिसांची बघ्याची भूमिका !
- मशिदीत जाऊन अनधिकृत भोंग्याचा आवाज न्यून करण्यास सांगणार्या कु. करिश्मा भोसले हिचे अभिनंदन ! ही कृती करून कु. करिश्मा हिने समस्त धर्मप्रेमींसमोर एक आदर्शच ठेवला आहे !
- पोलिसांवर अरेरावी करणार्या धर्मांधांना कायद्याचा कोणताही धाक वाटत नाही, हेच यातून लक्षात येते ! या धर्मांधांनी उद्या हिंदूंवर आक्रमण केल्यास असे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ?
मुंबई : मानखुर्द येथील म्हाडाच्या ‘पी.एम्.जी.’ वसाहतीतील मशिदीवरील अनधिकृतरित्या लावलेल्या भोग्याचा आवाज न्यून करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या कु. करिश्मा भोसले या हिंदु युवतीला धर्मांधांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर या वेळी तेथे असलेल्या पोलिसांवरही धर्मांध महिला आणि पुरुष यांनी अरेरावी केली. अखेर हतबल झालेल्या पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. या प्रकरणानंतर अनधिकृत भोंग्याच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भोंग्याची दिशा पालटून आवाज न्यून करण्यासाठी नोटीस दिली; मात्र या नोटिसीला धर्मांधांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या नोटिसीनंतरही भोंग्यावरून मोठ्या आवाजात अजान दिली जात आहे; मात्र अद्याप या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
१. कु. करिश्मा भोसले या रहात असलेल्या इमारतीच्या जवळील मशिदीवरून दिवसातून ५ वेळा भोंग्यावरून अजान दिली जाते. याचा आजूबाजूच्या हिंदु कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो.
२. याविषयी २५ जून या दिवशी दुपारी ३ वाजता कु. करिश्मा यांनी मशिदीच्या ठिकाणी जाऊन भोंग्याचा आवाज अल्प करण्याची विनंती केली. त्या वेळी तेथे असलेल्या मुसलमानांनी ‘मौलवी सायंकाळी ५ वाजता येतील. त्यांना येऊन सांग’, असे तिला सांगितले.
३. त्यानुसार कु. करिश्मा या पुन्हा सायंकाळी ५ वाजता मशिदीकडे आल्या. त्यापूर्वी त्या ठिकाणी धर्मांध महिला, पुरुष आणि युवक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. (यावरून धर्मप्रेमी कु. करिश्मा हिला विरोध करण्यासाठीच धर्मांध तेथे एकत्र आले होते, हे लक्षात येते ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात) ही परिस्थिती पाहून कु. करिश्मा यांनी तेथे येण्यापूर्वीच मानखुर्द पोलीस ठाण्यात दूरभाष करून प्रसंगाची माहिती दिली होती.
(म्हणे) ‘त्रास होत असेल तर, कानात बोळे घ्याला !’ – मौलवीचे मग्रूरीचे उत्तर
कु. करिश्मा या सायंकाळी ५ वाजता मौलवींना भेटण्यासाठी पुन्हा तेथे गेल्या. त्यांनी भोंग्याच्या मोठ्या आवाजामुळे त्रास होत असल्याचे सांगून आवाज न्यून करण्याची मौलवींना विनंती केली. त्यावर मौलवींनी ‘त्रास होत असेल, तर कानात बोळे घाल. तक्रार करण्यासाठी येथे येऊ नको. तक्रार करायची असेल, तर पोलीस ठाण्यात जा’, असे मग्रूरीचे उत्तर दिले. त्या वेळी तेथे जमलेल्या धर्मांध महिला आणि पुरुष यांनी कु. करिश्मा हिच्या जवळ येऊन अरेरावी केली. तेथे असलेल्या धर्मांध महिलांनी ‘आमच्या घरातही भोंग्यांचा आवाज येतो; पण आम्हाला त्रास होत नाही’, अशा प्रकारे उर्मट उत्तरे दिली.
पोलिसांकडून कु. करिश्मा भोसले यांनाच नोटीस !
या प्रकरणानंतर पोलिसांनी मौलवींसह कु. करिश्मा यांनाही ‘मशिदीच्या येथे जाऊ नका’, अशी नोटीस दिली आहे. (जे काम खरे तर पोलिसांनी करायला हवे होते, ते काम कु. करिश्मा भोसले यांनी केले आहे. असे असतांना मशिदीवरील अनधिकृत भोंगा उतरवायला लावण्याऐवजी कु. करिश्मा यांनाच नोटीस देणे, हा प्रकार पोलीस यंत्रणेसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
मी हिंदु आहे, मला अजान ऐकायची नाही ! – अरेरावी करणार्या धर्मांध महिलेला कु. करिश्मा भोसले यांचे चोख उत्तर
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना कु. करिश्मा भोसले म्हणाल्या, ‘‘भोंग्याचा आवाज न्यून करण्यासाठी जेव्हा मी दुपारी ३ वाजता सांगून आले, तेव्हा त्या ठिकाणी काही वेळातच धर्मांध महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात जमले. मी पुन्हा जाऊन मशिदीच्या दरवाज्याची कडी वाजवली, त्या वेळी अनेक धर्मांध युवक आणि मौलवी तेथे आले. त्या वेळी एक धर्मांध महिला माझ्या अंगावर येऊन ‘‘आमच्याही खिडकीजवळ भोंगे आहेत, आम्हाला त्रास होत नाही’’, असे म्हणाली. त्यावर मी त्यांना ‘‘मी हिंदु आहे, मला अजान ऐकायची नाही’’, असे सांगितले. त्या वेळी एक धर्मांध महिला माझ्या अंगावर येऊन बोलत होती. ही महिला काही वर्षांपासून येथे चरस-गांजा विक्रीचा धंदा करत आहे. याविषयी पोलिसांना माहिती आहे. या प्रकरणानंतर २६ जून या दिवशी आमच्या इमारतीखाली अनेक धर्मांध जमा झाले होते.
बजरंग दलाकडून कु. करिश्मा भोसले यांच्या घराच्या ठिकाणी संरक्षण !
या प्रकारानंतर कु. करिश्मा आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोणता धोका पोचू होऊ नये, यासाठी त्यांच्या घराच्या ठिकाणी बजरंग दलाचे युवक संरक्षणासाठी थांबले आहेत. ‘वेळ पडल्यास आमचे युवक त्वरित तेथे जातील’, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे चेंबूर येथील जिल्हामंत्री श्री. लालाभाई यादव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. (हिंदूंच्या रक्षणासाठी तत्पर असणार्या बजरंग दलाचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
करिश्मा भोसले हिच्या कुटुंबियांना संरक्षण दिले जावे ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत
केवळ भोंग्याचा आवाज थोडा न्यून करायला सांगितला; म्हणून झालेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. कु. करिश्मा भोसले हिच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, तसेच हे प्रकरण त्वरित सोडवले पाहिजे, असे ‘ट्वीट’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले आहे. या ‘ट्वीट’ला त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस यांना ‘टॅग’ करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे.
हिंदु राष्ट्र सेनेकडून कु. करिश्मा भोसले यांचा ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मान !
हिंदु राष्ट्र सेनेकडून कु. करिश्मा भोसले यांचा ‘शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी कु. करिश्मा भोसले यांच्या घरी जाऊन त्यांना याविषयीचे सन्मानपत्र प्रदान केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात