- ‘साम्यवादी सरकारच्या राज्यात असे होणे हीच धर्मनिरपेक्षता आहे’, असेच पुरो(अधो)गामी म्हणतील !
- स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या विवाहात असे होत असेल, तर राज्यांतील गुन्हेगार धर्मांधांवर किती कारवाई होत असेल, हे लक्षात येते !
थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या मुलीच्या १५ जून या दिवशी झालेल्या विवाहाला ‘अतीमहनीय व्यक्ती’ म्हणून उपस्थित राहिलेला महंमद हाशिम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता सुरेश बाबू यांच्या हत्येचा दोषी आहे. त्याला ‘पॅरोल’वर सोडण्यात आले आहे. यावरून भाजपने विजयन् यांच्याकडे उत्तर मागितले आहे.
१. विजयन् यांच्या मुलीचे लग्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते महंमद रियाज यांच्या मुलाशी झाले. या विवाहाला केवळ ५० जणच उपस्थित होते. त्यात महंमद हाशिम एक होता. तो महंमद रियाज यांचा नातेवाईक आहे. त्याला त्रिशूर येथे सुरेश बाबूच्या हत्येच्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा झालेली आहे. कोरोना संकटामुळे त्याला ‘पॅरोल’वर सोडण्यात आले आहे.
२. भाजपचे नेते संदीप वरियर यांनी फेसबूकवर म्हटले आहे की, ‘कोणतीही दोषी व्यक्ती सरकारी निवासस्थानी कशी येऊ शकते ? आणि ती मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून कशी उभी राहू शकते ? ही सुरक्षेमधील मोठी चूक आहे. गृहमंत्रालय स्वतः मुख्यमंत्र्यांकडेच आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात