अश्‍लीलता, हिंसा आणि हिंदुद्वेष पसरवणार्‍या ‘वेबसीरिज’चे परीनिरीक्षण करण्याच्या मागणीवरून ‘ट्विटर ट्रेंड’

#CensorWebSeries हा हॅशटॅग ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये तिसर्‍या स्थानावर

अशी मागणी का करावी लागते ? सरकार यावर स्वतःहून अशांवर नियंत्रण का आणत नाही ?

नवी देहली : गत काही वर्षांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी, झी ५ यांसारखी अनेक ‘अ‍ॅप’ प्रचलित होत आहेत. त्यांवर नवीन ‘वेबसिरीज’ (ऑनलाईन मालिका) येत असतात. या वेबसिरीज कोणतेही प्रमाणपत्र न घेता अथवा परीनिरीक्षण न करता प्रसारित केल्या जातात. ‘सेन्सॉर’ न झाल्यामुळे त्यांच्यात अश्‍लीलता, शिवीगाळ, व्यसनाधीनता, हिंसा आदी प्रचंड प्रमाणात दाखवले जाते. नुकतीच प्रसारित झालेली ‘पाताल लोक’ या वेब सिरिजमध्ये हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती यांचा अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अवमान करण्यात आला आहे. ‘हिंदू हे हिंसक आणि अभद्र वर्तन करतात’, असे त्यात दाखवण्यात आले आहे. ‘कोड एम्’, ‘कोर्ट मार्शल’ यांसारख्या वेबसिरीजमधूनही भारतीय सेनेला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्‍वभूमीवर २७ मे या दिवशी ट्विटरवर #CensorWebSeries हा हॅशटॅग (एकाच विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड झाला. काही काळातच हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या स्थानावर आला. त्यानंतर काही काळ तो तिसर्‍या क्रमांकावरही होता. या ट्रेंडमध्ये ६० सहस्रांहून अधिक ट्विट करण्यात आले.

या वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी वेबसिरीजच्या माध्यमातून कशा प्रकारे भारतीय आणि हिंदु संस्कृतीचे हनन केले जात आहे, हे ट्विटच्या माध्यमातून उघड केले. यासह ‘#BoycottPaatalLok’ हा हॅशटॅगही ट्विटरवर ‘ट्रेंड’ झाला. यात हिंदुविरोधी ‘पाताल लोक’ या वेबसिरीजला विरोध दर्शवण्यात आलाला. त्यासमवेत केंद्रीय प्रसारण मंत्रालय आणि गृहमंत्री यांच्याकडे या माध्यमातून प्रसारित होणार्‍या मालिका सेंन्सॉर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. दैनिक जागरण, फ्री प्रेस जर्नल, न्यूज १८, तमिल फिल्मी बीट, स्पॉट बॉय, विजय कर्नाटका यांसारख्या माध्यमांनी या ट्रेंडला प्रसिद्धी दिली.

या ट्रेंडच्या वेळी काही राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्वीट

१. एका धर्मप्रेमीने म्हटले आहे, ‘पाताल लोक’ या वेबसिरीजमध्ये एका रेल्वेगाडीत गोमांस असल्याच्या संशयावरून हिंदूंचा समूह मुसलमानांवर आक्रमण करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. वर्ष २०१७ मध्ये जुनैद नावाच्या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाली होती. न्यायालयाने त्या प्रकरणात स्पष्ट केले होते की, ती हत्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी झाली होती. असे असूनही हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी असे दाखवले आहे.’

२. अन्य एका धर्मप्रेमीने म्हटले आहे, ‘यापूर्वी ‘सॅक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमधून गुरु-शिष्य परंपरेचा अपमान करण्यात आला होता. ‘लैला’ नावाच्या वेबसिरीजमध्ये हिंदूंना ‘तालिबानी’ दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे या वेबसिरीचा उद्देश केवळ हिंदुद्वेष करणे आहे, हे सिद्ध होते.’

३. कोणत्याही ‘सेंन्सॉरशिप’शिवाय या वेबसिरीज प्रसारित होत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीला धोक्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु विराेधी

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​