
मुंबई : आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांना वंदन करतो; मात्र गोमातेचे मांस खायचे आणि अन्य धर्मीय महिलांशी कुकृत्य करायचे, हाच ज्यांचा इतिहास आहे, अशांविषयी सहानुभूती कशी बाळगावी ? काही महानुभव अपवाद होते. त्यांना आम्ही वंदनीय मानतो. त्यामुळे सहानुभूती सोडून सरसंघचालकांनी पंतप्रधानांना निर्भयपणे हिंदु राष्ट्र स्थापण्याविषयी सुचवले पाहिजे, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक आचार्य धमेंद्रजी महाराज यांनी केले. सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी २६ एप्रिल या दिवशी फेसबूकद्वारे केलेल्या मार्गदर्शनात मुसलमानांप्रती सहानुभूती दाखवण्याचे आवाहन केले होते. यावर आक्षेप नोंदवत आचार्य धर्मेंद्रजी महाराज यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी आचार्य धर्मेंद्रजी महाराज पुढे म्हणाले की,
१. विश्वातील सर्वांत मोठे स्वयंसेवक संघटन असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी भय आणि आतंक या कारणांमुळे व्यक्त होणार्या अन् घाबरलेल्या काही मुसलमानांप्रती द्वेष व्यक्त न करता सहानुभूती बाळगावी, असे सुचवले आहे. मुसलमानांंविना भारतात रहाण्याची कल्पना करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
२. इस्लामचा जन्म केवळ १ सहस्र ५०० वर्षे जुना आहे आणि हिंदु धर्माची अतीप्राचीन परंपरा आहे. इस्लामी आक्रमक भारतात भय आणि आतंक घेऊन आले. शांती आणि प्रेमाची पताका घेऊन इस्लामी आक्रमक आले नाहीत. रक्ताच्या नद्या घेऊन आले, हा इतिहास उघड आहे.
३. अश्फाख उल्ला खानसाहेब, डॉ. अब्दुल कलाम, शहनाई वादक बिस्मिल्ला खानसाहेब अशा विभूतींना आम्ही शतशः नमन करतो; मात्र कट्टर धर्मांधांना आम्ही स्वीकारणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात