तबलिगी जमात आणि रोहिंग्या यांचे संबंध असल्याने गृहमंत्रालयाने काढला आदेश
- रोहिंग्या घुसखोरांना यापूर्वीच हाकलले असते, तर आज ही स्थिती उद्भवली नसती !
- रोहिंग्यांनंतर आता बांगलादेशींनाही शोधून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि या सर्वांनाच लवकरात लवकर देशातून हाकलून लावले पाहिजे !
नवी देहली – रोहिंग्या मुसलमानांची माहिती मिळवून त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिला आहे. रोहिंग्या मुसलमान तबलिगी जमातच्या सदस्यांच्या संपर्कात आल्याचा संशय असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. ‘यासंबंधी आवश्यक असलेली सर्व पावले उचला’’, असा आदेश देण्यात आला आहे. जम्मू, भाग्यनगर, मेवात या शहरांसह पंजाब, देहली, तेलंगण या राज्यांतील रोहिंग्यांवर विशेष लक्ष देत ओळख पटवण्यास सांगण्यात आले आहे.
तेलंगणमध्ये वास्तव्यास असणार्या रोहिंग्या मुसलमानांनी तबलिगी जमातच्या हरियाणामधील मेवात येथील कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. हेच लोक देहलीतील निजामुद्दीन मरकजमध्येही सहभागी झाले होते. रोहिंग्यांशी संबंधित लोक श्रमविहार आणि शाहीनबाग येथेही गेले होते. जे लोक या ठिकाणांवर गेले होते ते त्यांच्या छावण्यांमधून गायब आहेत