आसाममध्ये ९१ टक्के वाढ !
नवी देहली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४ सहस्र ३७८ झाली असून त्यातील ४ सहस्र २९१ रुग्ण तबलिगी जमातशी संबंधित आहेत. २३ राज्यांमध्ये तबलिगी जमातमुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आसाममध्ये तबलिगी जमातमुळे तब्बल ९१ टक्के रुग्ण वाढले, उत्तरप्रदेशमध्ये ५९ टक्के, तर देहलीमध्ये ६३ टक्के रुग्ण वाढले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माहिती देतांना सांगितले की, गेल्या २४ घंट्यांमध्ये कोरोनामुळे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २८ दिवसांत २३ राज्यांतील ४५ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ४८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण १ सहस्र ९९२ रुग्ण यातून बरे झाले आहेत.