पुणे परिसरातील मशिदींच्या अवैध बांधकामांवर कारवाई करा ! – समस्त हिंदु आघाडी

  • येरवडा, वानवडी, उरळी कांचन आणि कुरकुंभ येथे नियम धाब्यावर बसवून मशिदींचे बांधकाम

  • अवैध बांधकामांविषयी तक्रार करूनही प्रशासनाचा कानाडोळा

अशी मागणी का करावी लागते ? अल्पसंख्यांकांची काही प्रार्थनास्थळे म्हणजे देशविरोधी कारवायांची केंद्रे असल्याचे पुरावे सुरक्षायंत्रणांकडे असतांना एव्हाना सरकारी यंत्रणांकडून अशी अवैध बांधकामे करणार्‍यांवर स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते ! येथे तक्रार करूनही त्याकडे कानाडोळा केला जात असेल, तर ते संतापजनक होय !

पुणे : येथील येरवडा, वानवडी, उरळी कांचन आणि कुरकुंभ या ठिकाणी मशिदींचे अवैधरित्या काम चालू असून प्रशासनाने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदु आघाडीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याविषयी संघटनेने प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

निवेदनात मांडण्यात आलेली सूत्रे . . .

१. येरवडा : येथील गुंजन चौकातील अक्सा मशिदीमध्ये नेहमी गुन्हेगारांचा वावर असतो, अशी माहिती मिळाली आहे. एक मौलवी या ठिकाणी अत्यंत विखारी प्रचार करून द्वेष पसरवतो. गृहखाते, तसेच पुणे महापालिका यांची कोणतीही अनुमती न घेता नवीन माळा (मजला) वाढवण्याचे काम या ठिकाणी चालू केले आहे. पोलीस आणि महापालिका या दोन्ही ठिकाणी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. येरवड्यामध्ये गेल्या २ वर्षांत ३ हिंदूंच्या हत्या झाल्या असून या मशिदीतील संबंधित लोकांना त्याविषयी आरोपी करण्यात आले आहे. ही मशीद म्हणजे हिंदु स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमण आहे.

२. वानवडी : येथे दाऊदी बोहरा समाजाची नवीन मशीद बांधली जात आहे. या बांधकामाच्या भूमीपूजनाच्या ‘फ्लेक्स’वर ‘मशीद’ असे स्पष्ट लिहिले होते; मात्र बांधकामासाठी महापालिकेची अनुमती घेतांना निवासी बांधकामाची अनुमती घेतल्याचे दिसून येत आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेची अनुमती घेतांना खोटा नकाशा प्रविष्ट केला होता. महापालिकेने समक्ष पहाणी न करता बांधकामाला अनुमती दिली आहे.

३. उरळी कांचन : येथे ग्रामपंचायतीसमोर एका हिंदु व्यक्तीच्या वैयक्तिक भूमीत अतिक्रमण करून मशिदीचे बांधकाम चालू आहे. गावामधील धर्मांधांची गुंडगिरी वाढली आहे. पोलीस उघडपणे धर्मांधांची बाजू घेऊन हिंदु व्यक्तीलाच दमदाटी करत आहेत. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) कोणतीही अनुमती अथवा कागदपत्रे नसतांनाही प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू आहे.

४. कुरकुंभ : पुणे – सोलापूर मुख्य रस्त्यावर गृहखात्याची अनुमती न घेता अवैधरित्या मशीद बांधण्याचे काम चालू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

५. शिवाजीनगर पोलीस वसाहत : पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखालील या भूमीत कोणतीही अनुमती न घेता मशिदीचे बांधकाम वाढवण्यात आले आहे. ( जर हे सत्य असेल, तर हे अतिशय गंभीर आहे. पोलिसांच्या भूमीत असे अतिक्रमण करण्याचे धर्मांध धारिष्ट्य करतात, यावरून त्यांना पोलिसांचे भय न उरल्याचे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या ठिकाणी बाहेरील लोक नमाज पढण्यासाठी येतात. त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलीस वसाहतीशेजारील मोठी मशीद आणि निग्रो वगैरे लोकांची वर्दळ हा विषय सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर आहे. त्या दृष्टीने वरील प्रकरणांमध्ये कारवाई व्हावी.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याविषयी संपर्क करून विचारणा केली, तेव्हा त्यांनी शहर अभियंत्याकडे विचारणा करण्यास सांगितले; मात्र त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनधर्मांधराष्ट्रीयहिंदु विराेधी

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​