नवी देहली : येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमीत मंदिर उभारण्यासंबंधी निर्णय येण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून जो काही निर्णय येईल, तो खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे. या निर्णयानंतर संपूर्ण देशातील वातावरण सौहार्द राहावे, हे सगळ्यांचे दायित्व आहे, असे ‘ट्वीट’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. रामजन्मभूमीच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून त्याच्या निकालाची प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. हा निर्णय येण्याआधी संघाने वरील आवाहनाचे ‘ट्वीट’ केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही ‘रामजन्मभूमीच्या वादावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा’, असे आवाहन केले आहे. यापूर्वीही विहिंप आणि बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी बंधूभाव राखण्याचे आवाहन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात