अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची सरकारकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर उमटलेले पडसाद

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये ! प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेनेच हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा पुरवणे अपेक्षित !

नवी देहली : हिंदु समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबर या दिवशी हत्या झाल्यानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी सरकारकडे सुरक्षा मिळण्याची मागणी केली आहे. सदर नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क करून ‘या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुरक्षा पुरवण्याचा प्रस्ताव ठेवावा’, अशी मागणी केली आहे. ते राज्य सरकारांनाही पत्र लिहून याविषयी सूचित करत आहेत.

१. साध्वी प्राची यांनी त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, यासाठी अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमाजवळ काही संदिग्ध लोक टेहळणी करत असल्याची शंका आहे. पाकिस्तानच्या आतंकवादी संघटनांच्या निशाण्यावरही त्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२. अखिल भारतीय हिंदु महासभेचे उत्तरप्रदेश अध्यक्ष राजीव कुमार आणि उत्तरप्रदेशच्या नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनाही जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. २० ऑक्टोबर या दिवशी नोएडा येथील जानी यांच्या घरी एक बंद पाकीट प्राप्त झाले. त्यात असलेल्या धमकीच्या पत्रामध्ये लिहिले आहे की, ‘कमलेश तिवारी यांच्यानंतर आता तुमचा क्रमांक आहे.’ या विरोधात जानी यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे.

३. मध्यप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ श्री. उपदेश राणा यांनाही आंतरराष्ट्रीय दूरभाष क्रमांकावरून ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या समर्थकांनी मध्यप्रदेशच्या माकडॉन पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

४. देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन भाषण देणारे प्रसिद्ध वक्ता श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनाही सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्यासह कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली आहे.

५. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर हिंदु नेते अन्य धर्मियांच्या विरोधात वारंवार वक्तव्य करत असल्यामुळे त्यांना धमक्या मिळत आहेत. (‘विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे’, हा विचार सतत प्रसृत करण्याचा आटापिटा करणारे  पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

६. कमलेश तिवारी यांच्या हत्येचे संबंध आता कर्नाटकपर्यंत पोचले असून हुब्बळ्ळी येथील सादिक कुप्पेलूर नावाच्या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेशाच्या बरेली जिल्ह्यातील आला हजरत दर्गाचा इमाम सय्यद कैफी अली आझमी यालाही चौकशीसाठी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

आक्रमणधर्मांधराष्ट्रीयहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​