कमलेश तिवारी हत्या प्रकरण : सूरत येथून ३ धर्मांध आणि उत्तरप्रदेशातून २ इमाम अटकेत

  • उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येचे प्रकरण

  • रशीद पठाण मुख्य सूत्रधार असल्याची उत्तरप्रदेश पोलीस महासंचालकांची माहिती

  • दुबईमध्ये कट रचला !

जिहाद्यांकडून झालेल्या या हत्येविषयी पुरो(अधो)गामी आता का बोलत नाहीत ? पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणारे आता का गप्प आहेत ?

हिंदूबहुल भारतात हिंदुद्वेषी म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढली, तसेच आतंकवाद्यांना मार्गदर्शन करणार्‍या झाकीर नाईक याने हिंदु धर्मावर खालच्या स्तराला जाऊन टीका केली आणि तो भारताबाहेर पळाला. अशा कृती करूनही दोघे निर्धास्त होते. याउलट कमलेश तिवारी यांना अन्य धर्माविषयी बोलल्यामुळे जीव गमवावा लागला ! यावरून हिंदूबहुल भारतात हिंदू नव्हे, तर अन्य धर्मीयच सुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !

लक्ष्मणपुरी – येथील हिंदु स्वराज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी २ इमामांना, तर गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने रशीद पठाण, मोहसीन शेख आणि फैजान या तिघांना अटक केली आहे. ‘२३ वर्षीय रशीद पठाण हा या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. दुबईमध्ये तिवारी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यात पठाण याचा समावेश होता’, असे उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वर्ष २०१५ मध्ये महंमद पैगंबर यांच्या विरोधातील कथित आक्षेपार्ह विधानामुळेच तिवारी यांची हत्या झाल्याचे सिंह यांनी सांगितले. ‘असे असले, तरी त्याविषयी अद्याप पुरावा मिळालेला नाही’, हेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. सूरतच्या आरोपींनी गुन्हा स्वीकारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रशीद पठाण याला संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे. तो व्यवसायाने शिंपी आहे. मोहसीन शेख २४ वर्षांचा असून तो सूरतमध्ये साड्यांच्या एका दुकानात काम करतो, तर तिसरा फैजान २१ वर्षांचा असून तो चपलांच्या दुकानात काम करतो. (‘गरिबीमुळे मुसलमान गुन्हेगारीकडे वळतात’, असे म्हणणारे आता काही बोलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मौलाना अनवारूल हक आणि मुफ्ती नईम कह्यात

कमलेश तिवारी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मौलाना अनवारूल हक आणि मुफ्ती नईम काझमी यांना कह्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मौलाना अनवारूल हक यांनी कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित विधान केल्यावर त्यांचा शिरच्छेद करणार्‍यास ५१ लाख रुपये देण्याची घोषणा वर्ष २०१५ मध्ये केली होती, तर मुफ्ती काझमी याने दीड कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

(म्हणे) ‘तिवारी यांच्या सुरक्षेत कोणताही हलगर्जीपणा नाही !’ – ओ.पी. सिंह

पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी म्हटले की, कमलेश तिवारी यांना संपूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यात कोणताही हलगर्जीपणा करण्यात आला नव्हता. सुरक्षेसाठी एक पोलीस आणि एक शस्त्रधारी पोलीस त्यांच्या समवेत होते. (असे आहे, तर त्यांची हत्या झाली, तेव्हा हे दोघे कुठे होते ? यांतील एकजण तेथे झोपलेला होता, असे उघड झाले आहे, तर दुसरा कुठे होता? याविषयी ओ.पी. सिंह का सांगत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

स्थानिकांच्या सहभागाची शक्यता !

कमलेश तिवारी यांच्या हत्येमध्ये अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. मारेकर्‍यांना तिवारी यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे आणि हत्येनंतर त्यांना पळून जाण्यास साहाय्य करणे यात स्थानिकांचा समावेश असल्याची शक्यता आहे.

सामाजिक माध्यमातून ‘अल् हिंदु ब्रिगेड’ने दायित्व घेतल्याचा प्रसार

कमलेश तिवारी यांच्या हत्येचे दायित्व ‘अल् हिंदु ब्रिगेड’ या संघटनेने घेतल्याचे वृत्त सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. ही आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे; मात्र पोलिसांनी याला कोणताही दुजोरा दिलेला नाही. ‘इस्लाम अथवा मुसलमान यांच्या विरोधात बोलणार्‍यांची हीच गत होईल. याहून अधिक पहाण्यासाठी सिद्ध व्हा. युद्ध चालू झाले आहे’, असे या संघटनेने म्हटले असल्याचे प्रसारित होणार्‍या वृत्तात म्हटले आहे. या वृत्ताच्या मागे धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही म्हटले जात आहे.

कमलेश तिवारी यांचे पार्थिव मूळ घरी नेले !

कमलेश तिवारी यांचे पार्थिव त्यांच्या सीतापूरमधील महमूदाबादमधील मूळ गावी नेण्यात आले आहे. ‘जोपर्यंत योगी आदित्यनाथ येथे येत नाहीत, तोपर्यंत तिवारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत’, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे १८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा तिवारी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे शर्मा यांना माघारी फिरावे लागले. तिवारी यांचा मुलगा श्री. सत्यम् तिवारी यांनी ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या हत्येची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

हत्या करण्यासाठी आलेल्या धर्मांधांनी परिधान केले होते भगवे कुडते !

सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरणातून असे स्पष्ट दिसून येते की, हत्या करण्यासाठी आलेल्या दोन्ही मारेकर्‍यांनी भगवे कुडते परिधान केले होते. स्वतःची ओळख लपवण्यासाठी आणि पोलीसयंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी धर्मांध कसे षड्यंत्र रचतात, हे यातून दिसून येते !

कमलेश तिवारी यांच्या विरोधात षड्यंत्र रचून महंमद पैगंबर यांच्याविषयीचे विधान प्रसिद्ध करण्यात आले ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरून त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे; मात्र प्रत्यक्षात त्यांनी असे विधान केलेच नव्हते, असे त्यांचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले. तिवारी यांचे कथित विधान ‘आग और अंगारे’ यामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. या संदर्भात अन्वेषण यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून तिवारी यांनी असे विधान केल्याचे कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचे समोर आलेले आहे आणि याविषयी उच्च न्यायालय अन् सर्वोच्च न्यायालय येथे आम्ही सांगितलेले आहे. तिवारी यांचे विधान प्रसिद्ध करण्यामागे षड्यंत्र होते, असा दावाही अधिवक्ता जैन यांनी केला. ते ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलत होते.

कोणालाही सोडणार नाही ! – योगी आदित्यनाथ

कमलेश तिवारी यांची हत्या राज्यात दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे. या हत्येच्या प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा कट चिरडून टाकण्यात येईल, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ‘तिवारी यांचे कुटुंबीय मला भेटायला आले, तर मी त्यांची भेट घेईन’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कमलेश तिवारी यांची हत्या हा देश, धर्म आणि हिंदुत्व यांवर मोठा आघात ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

कमलेशजी तिवारी यांची क्रूर हत्या हा देश, धर्म आणि हिंदुत्व यांवर मोठा आघात आहे. त्यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. भारतमातेच्या सुपुत्रास शत शत प्रणाम ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

आरोपींचा आतंकवादी संघटनेशी संबंध नसल्याचा पोलिसांचा दावा

सूरतमधून कह्यात घेण्यात आलेल्या तिघांचे कोणत्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नाहीत. जर असे काही संबंध असल्याची पुढील चौकशीत माहिती मिळाली, तर त्याविषयी सांगण्यात येईल, असे ओ.पी. सिंह यांनी सांगितले. रशीद पठाण याने कट रचला, मोहसीन याने तो पूर्ण केला, तर फैजान याने मिठाई खरेदी केली होती. याच मिठाईच्या डब्यातून मारेकर्‍यांनी चाकू आणि पिस्तुल नेले होते अन् त्याद्वारे तिवारी यांची हत्या केली होती. या डब्याच्या आधारे पोलिसांनी चौकशी करून या तिघांना कह्यात घेतले आहे. सूरत येथील मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाल्यावर त्यांना कह्यात घेण्यात आले. या प्रकरणात अन्य दोघांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली; मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले. यात रशीद याचा भाऊ आहे, तर दुसरी गौरव तिवारी नावाची व्यक्ती आहे. आवश्यकता वाटली, तर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल. उत्तरप्रदेश पोलीस सातत्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाच्या संपर्कात आहे. तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी लहान लहान पथके बनवलेली आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये १० दिवसांत ४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या

  • ८ ऑक्टोबरला देवबंद येथे भाजप नेते यशपाल चौधरी
  • १० ऑक्टोबरला बस्ती येथील भाजप नेता कबिर तिवारी
  • १२ ऑक्टोबरला सहारणपूर येथील भाजप नगरसेवक धारा सिंह
  • १८ ऑक्टोबरला हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी

कमलेश तिवारी यांच्या मारेकर्‍यांचा लवकरात लवकर शोध लावावा ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, कोल्हापूर.

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय हिंदु महासभेच्या वतीने मी निषेध करतो. कमलेश तिवारी यांना यापूर्वी काही मुसलमान संघटनांनी उघडपणे त्यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. याचा गांभीर्याने विचार करून ‘त्यातील कोणाचा यात सहभाग आहे का ?’, या दृष्टीने अन्वेषण होणे अत्यावश्यक आहे. कमलेश तिवारी हे हिंदु महासभेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांचे हिंदुत्वासाठी अतुलनीय योगदान होते. कमलेश तिवारी यांच्या मारेकर्‍यांचा लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी मी हिंदु महासभेच्या वतीने करत आहे.

उत्तरप्रदेश शासनाने या घटनेला न्याय मिळवून द्यावा ! – अधिवक्ता जयेश तिखे, अखिल भारत हिंदुमहासभा कार्यकर्ता, ठाणे

कै. कमलेश तिवारी यांची हत्या ही पुष्कळ दुःखदायक आणि वेदनामय घटना आहे. आज समाजात हिंदूंना ताठ मानेने, अभिमानाने, तसेच निर्भयतेने जगता यावे यासाठी कार्य करणारे जे काही थोडे धर्मप्रेमी आहेत, त्यातील कमलेश तिवारी हे एक होते. त्यांनी केलेले कार्य हे अनुकरणीय आहे. त्यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे हिंदु समाजाची मोठी हानी झालेली आहे. सध्या भारतामध्ये हिंदूंसाठी कार्य करणार्‍यांचे हत्याकांड चालू आहे, ते पुष्कळ क्रूर, भयानक आणि समाजमनात राग आणि त्वेषास (द्वेषास) जन्म देणारे आहे. मी हिंदू महासभेचा एक कार्यकर्ता या नात्याने कै. कमलेश तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ‘त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होवो’, अशी ईश्‍वर चरणी प्रार्थना करतो. कै. कमलेश तिवारी हिंदू समाजाच्या हितासाठी लढले. हिंदुत्वनिष्ठ शासन असलेल्या उत्तरप्रदेश शासनाने न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा आहे. या घटनेविषयी न्याय नक्की होईल, हा माझा ठाम विश्‍वास आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

आक्रमणधर्मांधराष्ट्रीयहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​