लैंगिक दृष्यांमधून गुरु-शिष्य परंपरेची अपर्कीती करण्याचा ‘नेटफ्लिक्स वेबसिरीज’चा प्रयत्न

शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश सोलंकी यांची पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

  • मनोरंजनाच्या माध्यमातून हिंदुद्वेष प्रसारित करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र होय ! केंद्र सरकारने याची नोंद घेऊन अशा आस्थापनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘खलनायक’ संबोधणार्‍या ‘एबीपी माझा’ला ज्याप्रमाणे हिंदूंनी संघटित होऊन ताळ्यावर आणले, त्याच प्रमाणे ‘नेटफ्लिक्स’ला हिंदूंनी त्याची जागा दाखवावी ! यासाठी परिणामकारक संघटन आवश्यक आहे !

मुंबई – लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु-शिष्य परंपरेची अपर्कीती करण्याचा प्रयत्न ‘नेटफ्लिक्स वेबसिरीज’मधून करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदु धर्माची अपर्कीती होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, अशी तक्रार शिवसेनेचे आयटी सेलमधील कार्यकर्ते श्री. रमेश सोलंकी यांनी काळबादेवी येथील एल्टी मार्ग पोलीस ठाण्यात ३ सप्टेंबरला केली आहे. (‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात तक्रार करणारे शिवसेनेचे श्री. रमेश सोलंकी यांचे अभिनंदन ! अशी तत्परता प्रत्येक हिंदूने दाखवून हिंदु धर्माचे होणारे विडंबन थांबवले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘नेटफ्लिक्स’ हे ‘ऑनलाइन’ मनोरंजन कार्यक्रम प्रसारित करणारे अमेरिकास्थित आस्थापन आहे. (केवळ अमेरिका सरकार नव्हे, तर तेथील आस्थापनेही हिंदुविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. ‘नेटफ्लिक्स’च्या माध्यमातून हिंदु धर्माचे चुकीचे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केले जात आहे. त्यामुळे जगभरात हिंदु धर्माविषयी चुकीची माहिती प्रसारित होत आहे.

२. ‘सॅक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या ‘सिरीज’मधून हिंदु धर्माची अपर्कीती करण्यात आली आहे. जगभरातील सर्व गुन्ह्यांसाठी हिंदूच उत्तरदायी असल्याचे या ‘सिरीज’मध्ये दाखवण्यात आले आहे. (जगातील आतंकवाद्यांच्या सूचीत धर्मांधांची संख्या लक्षणीय असून त्यांच्यामुळे जगातील वातावरण अस्थिर झालेे आहे. मोगलांपासूनचा हा इतिहास असतांना केवळ हिंदूद्वेषापोटी ‘नेटफ्लिक्स’ असे कार्यक्रम दाखवून हिंदू-मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का ? त्यामुळे याविरोधात हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने लढा दिला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. वेदांमधील ‘अहम् ब्रह्मास्मी’ या वचनाला फार महत्व आहे. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये लोक एकमेकांना भेटल्यावर हे शब्द वापरून शुभेच्छा देत मानवतेविरुद्ध कारवाई करण्यास प्रवृत्त करतात, असे या ‘वेबसिरीज’मध्ये दिसून येते. (हिंदू सहिष्णु असल्याने नेटफ्लिक्स असे दाखवण्याचे दु:साहस करतो ! नेटफ्लिक्सवरून इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांचे कधीही विडंबन करण्यात येत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. ‘सॅक्रेड गेम्स’समवेतच नेटफ्लिक्सवरील हुमा कुरेशी यांची भूमिका असणारी ‘लैला’ मालिका, अभिनेत्री राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असणारी ‘घौल’ मालिका आणि हसन मिन्हाज यांच्या ‘स्टॅण्डअप कॉमेडी शो’ यांच्या माध्यमातून भारत आणि हिंदु धर्म यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे श्री. सोलंकी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

श्री. रमेश सोलंकी

‘या तक्रारीची एक प्रत आणि ‘नेटफ्लिक्सच्या व्हिडिओ’ची ध्वनीचित्रचकती पुरावा म्हणून मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि सायबर सेल यांच्याकडे पाठवणार आहे. ‘नेटफ्लिक्स’च्या प्रत्येक ‘सिरीज’मध्ये हिंदु धर्माची अपर्कीती केली जात आहे. आपल्या देशाची वाईट प्रतिमा निर्माण करणारा ‘कंटेट’ नेटफ्लिक्स निर्माण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व केले जात आहे,’ असे मत श्री. रमेश सोलंकी यांनी ‘डीएन्ए’शी बोलतांना व्यक्त केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयशिवसेनाहिंदु विराेधीहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​