देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकरण

पुणे : काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेने देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी २५ ऑगस्ट या दिवशी बालगंधर्व चौकात घोषणा देऊन या घटनेचा धिक्कार केला. त्यानंतर काँग्रेसभवनापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी समस्त हिंदू आघाडी, हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतित पावन संघटना, बजरंग दल आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात