केवळ चिदंबरम्च नव्हे, तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप

सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर

भारताला ‘भ्रष्टाचारमुक्त देश’ करण्यासाठी प्रथम ‘काँग्रेसमुक्त भारत’ केला पाहिजे !

नवी देहली – ‘आयएन्एक्स मिडिया’च्या ३०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांना अटक करण्यात आली असली, तरी ते असा आरोप असणारे एकमेव काँग्रेसी नेते नाहीत. स्वतः चिदंबरम् यांचा मुलगा कार्ती यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि ते आता जामिनावर आहेत. तसेच चिदंबरम् यांच्या पत्नीवर बंगालमध्ये झालेल्या शारदा चिटफंड घोटाळ्याचा आरोप आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांवर असे आरोप आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. त्यातील काही पुढे देत आहोत.

काँग्रेसच्या नेत्यांचे घोटाळे

१. नॅशनल हेराल्ड घोटाळा : सोनिया गांधी आणि राहुल गांधी – या प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य काही नेते यात सहभागी आहेत. काँग्रेसच्या पैशांतून वर्ष १९३८ मध्ये ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ नावाचे आस्थापन स्थापन करण्यात आले होते. हे आस्थापन ‘नॅशनल हेराल्ड’, ‘नवजीवन’ आणि ‘कौमी आवाज’ ही ३ दैनिके चालवत होते. १ एप्रिल २००८ मध्ये ही तीनही दैनिके बंद करण्यात आली. यानंतर काँग्रेसने २६ फेब्रुवारी २०११ मध्ये या आस्थापनावर असलेले ९० कोटी रुपयांचे कर्ज स्वतःकडे घेतले होते. म्हणजेच काँग्रेसने या आस्थापनाला ९० कोटी रुपयांचे कजर्र् दिले. यानंतर ५ लाख रुपये खर्चून ‘यंग इंडियन’ आस्थापन बनवण्यात आले. यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भागीदारी प्रत्येकी ३८ टक्के आहे. नंतर यात अफरातफर करून ‘यंग इंडियन’ आस्थापनामध्ये ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ आस्थापनाला जोडण्यात आले. यानंतर काँग्रेसने ९० कोटी रुपयांचे कर्जही माफ केले. याद्वारे ‘यंग इंडियन’ आस्थापनाला ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या आस्थापनाचा मालकी अधिकार देण्यात आला. याला डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी विरोध केला. हा केवळ देहलीतील ‘हेराल्ड हाऊस’ची १ सहस्र ६०० कोटी रुपयांची इमारत कह्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप करत खटला प्रविष्ट केला. या खटल्यात सोनिया आणि राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे.

२. हेलिकॉप्टर घोटाळा : अहमद पटेल आणि कमलनाथ यांचा भाचा – ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ हेलीकॉप्टर खरेदी घोटाळा वर्ष २०१३ मध्ये उघडकीस आला होता. यात सोनिया गांधी यांचे राजकीय चिटणीस अहमद पटेल यांच्यावर या खरेदी प्रकरणात दलालीचे पैसे घेतल्याचा आरोप आहे आणि याचे अन्वेेषण सीबीआय आणि अन्य अन्वेषण यंत्रणा करत आहेत.

या प्रकरणात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांचाही समावेश आहे.

३. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट : अ‍ॅब्युलन्स खरेदी घोटाळा वर्ष २०१० ते २०१३ या कालावधीत झाला होता. यात ३१ जुलै २०१४ मध्ये जयपूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम्, आताचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मंत्री ए.ए. खान, श्‍वेता मंगल, शफी माथेर आणि अन्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

४. डी.के. शिवकुमार : कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्ष २०१७ मध्ये आयकर खात्याने शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या.

५. वीरभद्र सिंह – हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरोधातही उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्यावरून वर्ष २०१५ मध्ये त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या दिवशी सीबीआयने त्यांच्या घरावर धाड घातली होती. याची चौकशी चालू आहे.

६. हरीश रावत – उत्तराखंडचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरोधात वर्ष २०१६ मध्ये विधानसभेत बहुमत सिद्ध करतांना आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सीबीआय याची चौकशी करत आहे.

७. भूपिंदरसिंह हुड्डा – हरियाणातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या विरोधात गुरुग्राम येथील भूमी खरेदीच्या प्रकरणात चौकशी चालू आहे.

८. जगदीश टायटलर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देहलीतील शीख हत्याकांडातील आरोपी जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष २००९ मध्ये फसवणुकीचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​