काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना अटक

अटक टाळण्यासाठी चिदंबरम् सकाळपासून होते बेपत्ता !

काँग्रेसी नेत्याचा कायदाद्रोह ! इतर वेळी कायद्याच्या गप्पा मारणारे काँग्रेसवाले स्वतःवर कायद्याचे पालन करण्याची वेळ येते, त्या वेळी मात्र कायदाविरोधी वर्तन करतात !

नवी देहली : आयएन्एक्स मिडिया घोटाळ्याच्या प्रकरणात देहली उच्च न्यायालयाने २० ऑगस्टला माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांना कह्यात घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) पथक २१ ऑगस्टला सायंकाळी उशिरा रवाना झाले. सीबीआयचे अधिकारी निवासस्थानी पोचल्यावर चिदंबरम् यांनी दार उघडले नाही. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी दरवाजा ओलांडून घरात शिरले. त्यानंतर त्यांना कह्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम् सकाळपासून बेपत्ता होते. संध्याकाळी सीबीआयचे अधिकारी चिदंबरम् यांना कह्यात घेण्यासाठी निवासस्थानी गेले असता काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे जमले आणि त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यापूर्वी चिदंबरम् यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर सरन्यायाधिशांनी २१ ऑगस्टला सुनावणी करण्यास नकार दिला. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले चिदंबरम् यांनी २१ ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असे सांगितले.

घोटाळ्याचे प्रथमदर्शी मुख्य सूत्रधार चिदंबरम् ! – न्यायमूर्ती सुनील गौड

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौड यांनी २४ पानी निकालपत्रात म्हटले की, आयएन्एक्स मिडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात प्रथमदर्शी चिदंबरम् हेच मुख्य सूत्रधार (किंगपिन) आहेत. ते खासदार आहेत म्हणून त्यांची अटक टाळता येणार नाही. अशा प्रकरणात अटकपूर्व जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. हे बेहिशोबी मालमत्तेचे प्रकरण आहे.

भगव्या आतंकवादाचे सूत्र उपस्थित केल्याच्या प्रकरणातही चिदंबरम् यांची चौकशी करा !

काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदु आतंकवाद, भगवा आतंकवाद हे शब्दप्रयोग वारंवार होऊ लागले. ते करणार्‍यांमध्ये चिदंबरम्ही आघाडीवर होते. हे शब्दप्रयोग सतत वापरून हिंदूंना हिणवणारे चिदंबरम् यांनी कोणत्या आधारावर हिंदूंना अशा प्रकारे अवमानित केले, याचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे हिंदूंना अपेक्षित आहे.

(म्हणे) ‘आम्ही चिदंबरम् यांच्या बाजूने उभे आहोत !’ – प्रियांका वाड्रा

भ्रष्ट काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी काँग्रेसींच्या मागे असणारच ! भारतातील भ्रष्टाचार समाप्त करण्यासाठी प्रथम भारत काँग्रेसमुक्त करण्याची आवश्यकता आहे. प्रियांका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही भ्रष्टाचाराच्या प्रकरणी लवकरच कारागृहात जातील !

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी चिदंबरम् यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘चिदंबरम् कोणतीही तमा न बाळगता खरे बोलतात आणि सत्ताधार्‍यांची पोलखोल करतात. या सरकारचे अपयश त्यांनी उघड केले; पण भेकडांना सत्य गैरसोयीचे होते आणि अशाप्रकारे लज्जास्पदरित्या त्यांना कोंडीत पकडले जाते. (चिदंबरम् यांनी सत्तेत असतांना त्यांच्या पक्षाचे अपयश उघड करून ते सुधारण्याचा प्रयत्न का केला नाही ? कि काँग्रेसमधील लोकांना ते गैरसोयीचे होते, हे प्रियांका वाड्रा सांगतील का ? – संपादक) आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत आणि परिणामांची पर्वा न करता सत्यासाठी लढत राहू.’

घोटाळ्यांच्या पैशांतून स्पेनमध्ये टेनिस क्लबची खरेदी ! – ईडीचा आरोप

पी. चिदंबरम् यांचा मुलगा कार्ती यांनी स्पेनमध्ये टेनिस क्लब, ब्रिटनमध्ये टुमदार बंगला, तसेच भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर संपत्ती खरेदी केली आहे. ‘ही संपत्ती खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला ?’, ‘पैशांचा स्रोत काय आहे ?’, ते जाणून घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडीला) चिदंबरम् यांची चौकशी करायची आहे. आयएन्एक्स मीडिया प्रकरणातील घोटाळ्यांच्या पैशांतून ही संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

कार्ती चिदंबरम्

स्पेनच्या बार्सिलोनमधील टेनिस क्लब आणि भूमी यांचे मूल्य अंदाजे १५ कोटी रुपये आहे. ईडीने चेन्नईतील इंडियन ओव्हरसीज बँकेतील फिक्स डिपॉझीटमधील कार्ती यांचे ९ कोटी २३ लाख रुपये जप्त केले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​