हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीसह राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचाही मोहिमेत सहभाग

रायगड : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणार्‍या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना यांच्या वतीने स्थानिक प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

पेण

निवेदन स्वीकारतांना पेण येथील तहसीलदार सौ. अरुणा जाधव

पेण येथील तहसीलदार सौ. अरुणा जाधव यांना, तसेच पेण पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार श्री. सचिन मोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पोलिसांनी, आम्ही याविषयी योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. निवेदन देण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचे ह.भ.प. भोपतराव महाराज, श्री. नीलेश सुतार, मनसेचे श्री. सुनील मोदी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जगन्नाथ जांभळे आणि सनातनच्या साधिका उपस्थित होत्या.

पनवेल

पनवेल येथील निवासी नायब तहसीलदार श्री. दत्ता आदमाने यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारतांना समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पनवेल येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजय तायडे यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, दैनिकात लेख देऊन प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणार्‍या अवमानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांपेक्षा लोकांनी घेणे बंद केले, तर याला आपोआप आळा बसेल.

निवेदन देण्यासाठी समितीच्या वतीने श्री. कुणाल चेऊलकर राष्ट्रप्रेमी सर्वश्री विलास पुंडले, शंकर भोईर, सचिन पाटील, सौ. अनिता पाटील हे उपस्थित होते.

महाड

महाड येथील तहसीलदार श्री. चंद्रसेन पवार यांना, तसेच महाड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री. शैलेश सणस यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश पुरोहित, श्री. अजयजी मांगडे, श्री. अनंत कवे, सनातन संस्थेच्या सौ. अर्चना कवे, श्रीमती मनिषा खातू हे उपस्थित होते.

नागोठणे

निवेदन स्वीकारतांना नागोठणे येथील पोलीस निरीक्षक

नागोठणे येथेही पोलीस निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू रावकर महाराज आणि नागोठणे येथील राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि महाविद्यालये येथे निवेदन

नालासोपारा पोलीस ठाण्यात निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी युवक

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रध्वजासम कपडे, केक, जाहिराती आणि अन्य मार्गाने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये. असे करणार्‍यांवर कारवाई करावी. कागदी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची होणारी खरेदी-विक्री रोखावी, याविषयीचे निवेदन प्रशासन, पोलीस आणि महाविद्यालये यांना देण्यात आले आहे. या वेळी समितीसह, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद तसेच स्थानिक राष्ट्रप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही पत्रके, बैठका, फलक, सामाजिक प्रसारमाध्यमे, वैयक्तिक संपर्क आणि निवेदने यांच्या माध्यमातून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे.

मुंबई

निवेदन स्वीकारतांना उजवीकडे घनश्याम सराफ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, खेरवाडी पोलीस ठाणे, काळाचौकी पोलीस ठाणे, भोईवाडा पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाणे, आग्रीपाडा पोलीस ठाणे, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे, गावदेवी पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, माटुंगा पोलीस ठाणे, शिव पोलीस ठाणे, चेतना महाविद्यालय (वांद्रे), घनश्यामदास सराफ महाविद्यालय (मालाड) आणि प्रल्हादराय दालमिया महाविद्यालय (मालाड) येथे निवेदन देण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. खेरवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता शिजोळे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून समितीचे कार्य जाणून घेतले आणि प्रभावित होऊन समितीचे कौतुक केले. कर्तव्य बजावतांना आवश्यकता पडल्यास समाज प्रबोधनासाठी समितीच्या कार्यकर्त्यांचे साहाय्य घेऊ, असे त्यांनी सांगितले.

२. प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन्.एन्. पांडे यांनी महाविद्यालयात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्याची मागणी केली.

३. घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे यांनी विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्याची मागणी केली आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी जागृती करणार असल्याचे सांगितले.

निवेदन स्वीकारतांना डावीकडे चेतना महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. निकुंभ

पालघर

पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, वसई तहसीलदार कार्यालय, बोईसर पोलीस ठाणे, नालासोपारा (पश्‍चिम) पोलीस ठाणे आणि विरार पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण

या वेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मेहेंदळे यांनी समितीच्या कार्याची ध्वनीचित्रफित पाहून कार्याविषयी जाणून घेतले. कुलदेवतेचा आणि श्री दत्ताचा नामजप  कसा करावा ?, हे जाणून नामजप लिहून घेतला. या वेळी ते म्हणाले, तुमच्यासारखी माणसे भेटली की, बुद्धी सात्त्विक आणि मन शांत होते. राष्ट्रध्वजाविषयीचे तुमचे कार्य चांगले आहे. काही साहाय्य लागल्यास सांगा. तुमच्या कार्याला शुभेच्छा.

पाचोरा येथील पोलीस आणि महाविद्यालय प्रशासन यांना निवेदन सादर

निवेदन स्वीकारतांना पाचोरा येथील ठाणे अंमलदार श्री. पाटील

पाचोरा येथे एस्.एस्.एम्.एम्. महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस्.एम्. पाटील आणि पाचोरा येथील ठाणे अंमलदार श्री. पाटील यांना सौ. मीना जाधव, सौ. रेखा जाधव यांनी निवेदन दिले.

नांदेड येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन

शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. शिरसाठ यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

नांदेड : राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि विद्यार्थ्यांमधे राष्ट्रीय प्रतिकांविषयी जागृती करणे यांविषयीचे निवेदन येथील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या प्रसंगी प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. शिरसाठ आणि माध्यमिक विभागाचे कक्ष अधिकारी श्री. कासारेड्डी यांनी निवेदन स्वीकारले.

पुणे येथे राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न

पुणे : राष्ट्रीय दिवस केवळ त्या दिवसापुरतेच साजरे होऊ नयेत, तर राष्ट्रप्रेम कायमच मनात जागृत रहावे, राष्ट्रीय प्रतिकांचा उचित सन्मान राखला जावा आणि त्यांचे कळत-नकळत होणारे विडंबन रोखले जावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चळवळ जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबवण्यात आली. पोलीस-प्रशासन विभागांतील अधिकार्‍यांना निवेदने देणे, शाळांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, क्रांतिकारकांविषयी माहिती देणारे सचित्र प्रदर्शन आयोजित करणे, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जागृती करणे, भित्तीपत्रके लावणे असे या चळवळीचे स्वरूप होते. याचा सचित्र वृत्तांत देत आहोत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर येथील बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

सोलापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आणि कु. वर्षा जेवळे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये राष्ट्रध्वजाचे महत्त्व, राष्ट्रध्वजातील प्रत्येक रंगामागील अर्थ, राष्ट्रध्वज हाताळतांना कोणती काळजी घ्यावी, राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे राष्ट्रकर्तव्य कसे, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वातंत्र्यदिन सर्वच भारतीय साजरा करतात; पण या मुलाखतीच्या माध्यमातून सोलापूरकरांना तो आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा, तसेच राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन कसे रोखावे यांविषयी ज्ञात होणार आहे.

Related Tags

राष्ट्रध्वजाचा सन्मानसमितीकडून निवेदनहिंदु जनजागृती समिती

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​