अनधिकृत आंतरराष्ट्रीय ‘टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटर’च्या माध्यमातून आतंकवाद्यांशी संपर्क असल्याचा संशय
- यावरून जिहादी आतंकवाद्यांनी कसे षड्यंत्र रचले आहे, हे लक्षात येते !
- हा जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याची पाळेमुळेच नष्ट करणे आवश्यक आहे !
मुंबई : ९ ऑगस्ट या दिवशी आतंकवादविरोधी पथकाने वरळी, पनवेल, शिवाजीनगर (गोवंडी), डोंगरी मशीद बंदर, कल्याण अशा विविध ठिकाणी धाड टाकून एका अनधिकृत आंतरराष्ट्रीय ‘टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटर’च्या ७ जणांना अटक केली आहे. या सर्वांचा आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. घातपाती कृत्य करण्यासाठी या संशयितांनी आतंकवाद्यांशी संपर्क केल्याचा संशय पोलिसांना आहे. या कारवाईत ५१३ सीमकार्ड मिळाली असून त्यांचा उपयोग देशविरोधी कृत्यासाठी होत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
या कारवाईमध्ये ३ लॅपटॉप, ७ राऊटर, २ सर्व्हर, ११ भ्रमणभाषसंच असा साडेसहा लाख रुपयांचा माल कह्यात घेण्यात आला. या टोळीकडून ३७ कोटी रुपयांचा व्यवहार अनधिकृतरित्या झाला असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. कतार, कुवे या आखाती देशांतून येणारे दूरभाष आरोपींकडून अन्य ठिकाणी वळवण्यात येत होते. त्यामुळे यांचा संबंध आतंकवाद्यांशी असल्याचा संशय येऊन त्या दिशेने अन्वेषण चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात