गोरक्षकांवरील आक्रमण आता सहन केले जाणार नाही ! – बापूसाहेब ढगे, माजी नगरसेवक

सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर : गोरक्षकांवरील आक्रमण आता सहन केले जाणार नाही. त्यासाठी गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करा. ते होत नाही तोवर आम्ही हिंदुत्वनिष्ठ आंदोलन करतच रहाणार. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर सीबीआयने लावलेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणी माजी नगरसेवक श्री. बापूसाहेब ढगे यांनी केली. ते येथे ३१ जुलै या दिवशी जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि पूनम गेट येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन दिले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, विनोद रसाळ, यशपाल वाडकर, सौ. राजश्री देशमुख, श्रीमती अलका व्हनमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे सूत्रसंचालन कु. वर्षा जेवळे यांनी केले, तसेच या वेळी सर्वश्री आप्पा गवळी, सिद्धराम पुजारी, प्रवीण कुचन, साईप्रसाद आडम, भीमराज होळे, विशाल क्षीरसागर, श्रीराम सेनेचे सिद्धराम नंदर्गी यांसह हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती, युवा संघटक

छत्रपती शिवाजी महाराजांनी गायींची हत्या करणार्‍या कसायाचा हात छाटून टाकला. गायींचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासून प्रयत्नरत होते. ते होते; म्हणून गोमातेचे रक्षण होत होते. ज्याप्रमाणे आपण त्यांचे नाव घेऊन अभिमानाने भगवा ध्वज फडकवतो, त्याप्रमाणे त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण गोरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे. गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी. देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी.

आंदोलनातील अन्य मागण्या

१. हिंदु धर्मासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या नागा साधूंना अपकीर्त करण्याचा प्रयत्न ‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ‘लाल कप्तान’ चित्रपटावर बंदी आणावी.

२. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन मिळाला असला, तरी त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

क्षणचित्र : आंदोलनाच्या समोरून एक गाय दोन वेळा येऊन गेली, तसेच ती काही वेळ आंदोलनस्थळी उभी होती.

Related Tags

आक्रमणगोरक्षणराष्ट्रीय हिंदु आंदोलनसनातन संस्थाहिंदु जनजागृती समितीहिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​