जळगाव, भुसावळ, नंदुरबार येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करणार्‍यांवर कारवाईची मागणी

जळगाव/नंदुरबार : ‘बालभारती’च्या इयत्ता ७ वीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या विषयाच्या पुस्तकात पृष्ठ क्र. ८ वर महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. ही चूक ‘बालभारती’ने ११ जुलै या दिवशी केवळ एक शुद्धीपत्रक काढून दुरुस्त केल्याचे कळवत पुस्तकातील लिखाणात महाराणा प्रताप यांचा ‘आदरार्थी’ उल्लेख केला आहे. महाराणा प्रताप यांनी केलेले महान कार्य लक्षात घेता पाठपुस्तकात चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून आपण आपल्या महापुरुषांचा अवमानच केला आहे. महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करून केलेला अवमान हा अक्षम्य आहे. केवळ शुद्धीपत्रक काढून सुधारणा करण्याने नाही, तर संबंधितांवर कारवाई केल्यास असे प्रकार यापुढे होणार नाहीत. म्हणून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी जळगाव, भुसावळ आणि नंदुरबार येथे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी केली. २० जुलै या दिवशी जळगाव येथील आंदोलन महानगरपालिकेच्या इमारतीसमोर, नंदुरबार येथील आंदोलन नेताजी सुभाष बाबू चौक येथे आणि भुसावळ येथील आंदोलन २१ जुलै या दिवशी अष्टभुजा माता मंदिरासमोर करण्यात आले.

गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने गोवंश हत्या आणि गोतस्करी बंद होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. याउलट गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. बदलापूर, ठाणे येथील गोरक्षक श्री. चेतन शर्मा २४ जूनला पोलिसांसह अवैध पशूवधगृहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ३५० हून अधिक धर्मांध कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले. गोरक्षकांना आज कोणतेही संरक्षण नाही. गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी, देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत आदी मागण्याही आंदोलनामध्ये करण्यात आल्या. नंदुरबार येथे मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे यांना देण्यात आले. भुसावळ येथील आंदोलनाला गोसेवक रोहित महाले, विशाल टाक, तसेेेच शिवसेनेचे विभागप्रमुख उमाकांत शर्मा यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

आंदोलनातील अन्य मागण्या

१. हिंदु धर्मासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या नागा साधूंना अपकीर्त करण्याचा प्रयत्न ‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ‘लाल कप्तान’ चित्रपटावर बंदी आणावी.

२. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन मिळाला असला, तरी त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

Related Tags

आक्रमणगोरक्षणगोहत्याधर्मांधराष्ट्रीय हिंदु आंदोलनसनातन संस्थाहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​