गोरक्षकांची अटक आणि हिंदु धर्माचे विडंबन करणारा धर्मांध यांच्या विरोधात धुळे येथे विराट मोर्चा

  • धर्मद्रोह्यांच्या हृदयात धडकी भरेल असा मोर्चा !
  • ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी शहर दणाणले !

धुळे, १६ जुलै (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’प्रकरणी गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्यासह अन्य पाच जणांना करण्यात आलेली अटक, तसेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून स्वत:चा ‘व्हिडिओ’ प्रसारित करून धर्मांध वसीम रंगरेज याने हिंदु धर्म आणि देवता यांचे केलेले विडंबन यांच्या विरोधात १३ जुलै या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच १५ जुलै या दिवशी धुळे शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हा कडकडीत बंद यशस्वीरित्या पार पडला. धर्मद्रोह्यांच्या हृदयात धडकी भरेल असा विराट, परंतु संवैधानिक मोर्चा या वेळी काढण्यात आला. या मोर्च्याचे नेतृत्व कोणत्याही व्यक्तीकडे नव्हते. प्रत्येक जण आपली जात, पंथ, संप्रदाय, पक्ष बाजूला सारून एक हिंदू म्हणून यात सहभागी झाला होता.

आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्च्याचा आरंभ झाला. कराचीवाला खुंटाजवळील श्रीराम मंदिरात महाआरती करून मोर्च्याची सांगता झाली. मोर्च्याच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

क्षणचित्रे

१. मोर्चा पाच कंदीलपर्यंत आल्यानंतर सर्वांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक जप केला आणि एकदा हनुमान चालिसाचे पठण केले.

२. मिरवणुकीची सांगता प्रभु श्रीरामाच्या आरतीने, तसेच श्रीरामाचा नामजप करून करण्यात आली.

३. मिरवणुकीत पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मुसलमानबहुल भागात पोलीस मोठ्या संख्येने तैनात होते.

४. सर्व भागातील हिंदु तरुण स्वयंस्फूर्तीने मोर्च्यात सहभागी झाले होते.

५. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, राखीव सुरक्षा दलाच्या ५ तुकड्या, २५ पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने पोलीस प्रशासनासमोर करण्यात आलेल्या मागण्या

१. ज्या धर्मांधाने देवतांविषयी अश्‍लील भाषा केली, त्या धर्मांधाची धिंड काढण्यात यावी.

२. लव्ह जिहादमध्ये हिंदु तरुण फसू नये, यासाठी महिला पोलिसांची कुमक नेमण्यात यावी आणि त्वरित कार्यवाही करण्यात यावी.

३. गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्यावर प्रविष्ट केलेले कलम ३०७ त्वरित रहित करण्यात यावे.

४. धुळ्यातील ४८ अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

५. धुळ्यातील पाच कंदील परिसरामध्ये जे धर्मांध फळ विक्रेते हिंदु महिलांशी अश्‍लील भाषेत बोलतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

धर्मरक्षणासाठी संघटित होणार्‍या धुळे येथील हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

पक्ष आणि मान्यवर यांच्या प्रतिक्रिया

समाजकंटकांना सन्मानाची वागणूक आणि गोरक्षक श्री. शर्मा यांना पोलिसांनी दिलेली अपमानास्पद वागणूक निषेधार्ह आहे. – शिवसेना

त्या धर्मांधाला मोक्का लावा ! – अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, भाजप

आरोपीला मोक्का लावा. पोलिसांनी कठोर कारवाई केली, तरच धुळे शहरात शांतता राहील. चौपाटी, आईस्क्रिम पार्लर, चहा दुकाने यांवर पोलिसांनी विशेष लक्ष द्यायला हवे.

गोरक्षकांवरील गुन्हे मागे घ्या ! – आमदार कुणाल पाटील

गोरक्षक संजय शर्मा यांच्यासह इतरांवर प्रविष्ट झालेले कलम ३०७ चे गुन्हे प्रशासनाने मागे घ्यावेत. त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.

भगवा ध्वज लावण्यास पोलिसांचा विरोध

पाच कंदीलवर भगवा ध्वज लावण्यासाठी हिंदु मुले चढली असता पोलिसांनी त्यांना लाठीकाठीने मारून हाकलून लावले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

गोरक्षणगोहत्याधर्मांधपोलीसलव्ह जिहादहिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​