गोरक्षक शिवू उप्पार यांना न्याय देण्यासाठी ‘चलो बेळगाव’चे आवाहन

श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांची पत्रकार परिषद

डावीकडून अधिवक्ता रमेश गुड्डदगी, डॉ. अंजेश कणगलेकर, श्री. प्रमोद मुतालिक, श्री. जबरचंद्र जैन, श्री. बाळू कुराबर, श्री. विनय अंगरोळी

बेळगाव : शिवू उप्पार या गोरक्षकाचा संशयास्पद मृत्यू होऊन एक मास लोटून गेला; पण अजूनही त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शिवू उप्पार यांनी आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. ही आत्महत्या असेल, तर आत्महत्येच्या कारणाची चौकशी होणे आवश्यक आहे. सामाजिक प्रसारमाध्यमे आणि भ्रमणभाषच्या नोंदी (कॉल लिस्ट) यांतून ती हत्या झाल्याचा संशय बळावत आहे; परंतु याला आत्महत्येचे स्वरूप देऊन घटनेवर पांघरूण घालण्यात येत आहे. त्यामुळे हे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवू उप्पार यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) देण्यात यावा या मागणीसाठी ८ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता विविध हिंदू संघटना आणि गोप्रेमी यांनी ‘चलो बेळगाव’ असे आवाहन केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. हा विषय सर्वत्र पोचवण्यासाठी बेळगाव जिल्हा आणि तालुका अशा एकूण १६ ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या.

या वेळी भाजपच्या सौ. सीमा पवार, अधिवक्ता रमेश गुड्डदगी, जैन समाजाचे प्रतिनीधी श्री. जबरचंद्र जैन, हिंदू राष्ट्र सेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. बाळू कुराबर, श्रीराम सेना बेळगावचे जिल्हा कार्यादर्शी सूत्रसंचालक श्री. विनय अंगरोळी, श्रीराम सेना जिल्हा प्रमुख श्री. किरण शेट्टी आणि हिंदु जनजागृती समितीचे डॉ. अंजेश कणगलेकर आदी उपस्थित होते.

श्री. प्रमोद मुतालिक यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. शिवू उप्पार यांच्या कुटुंबाला मी प्रत्यक्ष भेटलो आहे. त्यांच्या कुटुंबियांवर कसलातरी दबाव आहे, तसेच त्यांच्यात भीतीचेही वातावरण आहे; पण आधार जाणवल्यावर ते मनमोकळेपणे आपली व्यथा मला सांगत होते.

२. हीच घटना एखाद्या मुसलमान युवकाविषयी घडली असती, तर संपूर्ण देश पेटून उठला असता. त्यामुळे प्रशासनाने योग्य तपास करून शिवू उप्पार आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.

३. सरकारने गोहत्या बंदी होण्यासाठी कठोर पावले उचलावीत. या घटनेविषयी स्थानिक स्तरावर न्याय न मिळाल्यास आम्ही केंद्र सरकारपर्यंत जाऊ.

Related Tags

गोरक्षणहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंवरील अत्याचार

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​