एबीपी माझाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे जनतेला आवाहन : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वा. सावरकर यांच्या अवमानाचे प्रकरण

मुंबई : एबीपी माझाने एका कार्यक्रमात स्वा. सावरकर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी सावरकरप्रेमींनी विविध मार्गांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बहिष्कार घालणे चालू केले आहे. हा कार्यक्रम त्यांच्या संकेतस्थळावरून काढून टाकून सर्व सावरकरप्रेमींची क्षमा मागावी अशी मागणी केली होती; मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर यांनी एबीपी माझाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

या संदर्भात आंदोलन उभे करण्यासाठी स्मारकाच्या वतीने एक गूगल अर्ज भरून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनात म्हटले आहे की, एबीपी माझाचा ‘मी’पणा, हट्टीपणा अजून संपलेला नाही. ‘उघडा डोळे बघा नीट’ अशी उद्दाम भाषा असणार्‍यांचे डोळे मात्र उघडायची चिन्ह नाहीत. सावरकरांची आणि जनतेची स्पष्ट शब्दांत जाहीर क्षमा मागणे, सर्व डिजिटल मीडियावरून दोन्ही कार्यक्रमांचे भाग (क्लिप्स) हटवणे हे अजूनही झालेले नाही. सगळे पटकन विसरून जाण्याची जनतेची सर्वसाधारणपणे मानसिकता असल्यामुळे आपण सारे दोन दिवसांत सर्व विसरून जाऊ, पुन्हा त्यांची वाहिनी बघायला लागू असा त्यांचा समज असणार. आपण आता तो हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. पुढची योजना ठरवण्यासाठी सावरकर स्मारकात सोमवारी १० जूनला बैठक होणार आहे. त्यात काय ठरेल, ते आपल्याला कळवले जाईल. तोपर्यंत आपला बहिष्कार चालूच ठेवावा. आपल्या बहिष्कारामुळे त्यांचा टीआर्पी न्यून झाला की जाहिरातदारही त्यांच्याकडे पाठ फिरवतील. या वाहिनीचा आडमुठेपणा अल्प होत नाही. त्यामुळे आता त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सावरकर स्मारकाच्या वतीने त्यांच्या जाहिरातदारांना एबीपी माझाच्या जाहिराती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपणही या वाहिनीला जे जाहिराती देतात त्यांच्या वस्तू वापरणे बंद करावे, त्याचाही वेगळा दबाव निर्माण होईल, असे आवाहन या अर्जात केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु विराेधीहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​