सुराज्य अभियान

शबरीमला मंदिराचे रक्षण करण्यासाठी हिंदु संघटनांनी सहकार्य करावे ! – बिनील सोमसुंदरम्, हिंदू हेल्पलाईन, केरळ

बिनील सोमसुंदरम्, हिंदू हेल्पलाईन, केरळ

शबरीमला अय्यप्पा मंदिर हे दक्षिणेतील हिंदूंचे पवित्र स्थान आहे. श्री अय्यप्पाचे व्रत आणि पूजाविधी यांविषयी हिंदूंमध्ये अतूट श्रद्धा आहे. श्री अय्यप्पा स्वामींच्या दर्शनापूर्वी ४१ दिवसांचे व्रत ठेवून ब्रह्मचर्य पाळावे लागते. हे व्रत १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना अशक्य असते आणि त्यासाठी त्यांना प्रवेश निषिद्ध ठरवण्यात आला आहे. हिंदु धर्मातील महिलांनी ते मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयीच्या आदेशाचा हिंदु धर्मातील सर्वांनी निषेध केला आणि या आदेशाच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळांवरून अभियान राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जेव्हा महिला श्री अय्यप्पा मंदिराची परंपरा तोडण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी रोखले. १५ सहस्र पोलिसांची फौज असतांनाही हिंदूंनी कोणालाही आत प्रवेश दिला नाही.
‘यापुढेही शबरीमला मंदिराचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी सहकार्य करावे’, असे आवाहन केरळ हिंदू हेल्पलाईनचे श्री. बिनील सोमसुंदरम् यांनी केले.

मेकॉलेप्रणित अभ्यासक्रम पालटून धर्माधिष्ठित केला, तर हिंदु राष्ट्र लवकर येईल ! – डॉ. देवकरण शर्मा, संस्थापक अध्यक्ष, श्री सप्तर्षि गुरुकुल, उज्जैन, मध्यप्रदेश

डॉ. देवकरण शर्मा, संस्थापक अध्यक्ष, श्री सप्तर्षि गुरुकुल, उज्जैन, मध्यप्रदेश

मेकॉले भारतात आल्यावर त्याने येथील संस्कृती नष्ट करण्यासाठी अभ्यासक्रम निर्माण केला आणि तो लागू केला. हा अभ्यासक्रम अजूनही चालू आहे. या अभ्यासक्रमामुळे आजही हिंदुत्वाची मोठी हानी होत आहे. लहान वयातील संस्कारांमुळे मनुष्य घडतो. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रांवर पडला आहे. मानवाच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आवश्यक आहेत. मात्र मेकॉलेच्या अभ्यासक्रमात केवळ अर्थ या पुरुषार्थाला महत्त्व आहे. त्यात संस्काराचे ज्ञान नसल्याने विवेक आणि हृदय यांचा विकास होत नाही. त्यामुळे मनुष्य स्वार्थी आणि विकारी बनला आहे. आमचे १६ संस्कार भ्रष्ट झाले आहेत. त्यात पाश्‍चात्य संस्कारांची घुसळण झाली आहे. आमचे शिक्षणक्षेत्र हिंदु संस्कृती न शिकवता संस्कृतीचे दोष शिकवते.

या अभ्यासक्रमामुळे देशात मोठ्या प्रमाणात हिंदुत्वविरोधी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, न्यायाधीश निर्माण झाले आहेत. आमचा अभ्यासक्रम भारतीय जीवनशैलीच्या मानदंडानुसार असला पाहिजे. धर्मनिष्ठ अभ्यासक्रम निर्माण केला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाविषयी ज्ञान देणारा अभ्यासक्रम हवा. आमचे पाठ्यपुस्तके असे असावे, ज्याने डाव्या विचारसरणीच्या लोकांना उत्तर मिळेल. यात पहिल्या वर्गापासून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम निर्माण करावा. शिक्षण हे क्षेत्र सरकारचा नाही, तर संत आणि आचार्य यांचा आहे. या अभ्यासक्रमामुळे हिंदु धर्माचे महत्त्व जगाला समजेल. आपल्या जीवनात शास्त्र आणि शस्त्र यांचे संतुलन आवश्यक आहे. याचाही समावेश आमच्या अभ्यासक्रमात असावा. आजचा मेकॉलेप्रणित अभ्यासक्रम पालटून तो धर्माधिष्ठित केला, तर हिंदु राष्ट्र लवकर येईल.

आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी आरोग्य साहाय्य समिती ! – अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य सहाय्य समिती

अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य सहाय्य समिती

आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्याच्या उद्देशाने आरोग्य साहाय्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे. लोकांमध्ये या क्षेत्रातील भ्रष्टाचाराविषयी जागृती निर्माण करण्यात येणार आहे, तसेच आरोग्य क्षेत्रात घुसलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी समिती इतर संघटनांच्या साहाय्याने कार्यरत रहाणार आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी माहिती अधिकार कायदा साहाय्यभूत ! – चंद्रकांत वारघडे, संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती, महाराष्ट्र

चंद्रकांत वारघडे, संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती, महाराष्ट्र

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर केला पाहिजे. समाजातील दुष्प्रवृत्ती उदा. भ्रष्टाचार, सनबर्न यांसारखे पाश्‍चात्य कार्यक्रम, गोहत्या, पशूवधगृह यांच्या विरोधात लढण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करू शकतो. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी माहिती अधिकार कायदा साहाय्यभूत ठरणारा आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी केले.

क्षणचित्र :

श्री. चंद्रकांत वारघडे यांनी प्रारंभी अधिवक्ता पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या अटकेचा निषेध केला आणि माहिती अधिकार कायद्याच्या आधारे सीबीआयकडून या प्रकरणी तरतुदीविषयीचे स्पष्टीकरण मागण्याची विनंती केली.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समिती

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​