अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या समारोपीय सत्रातील मान्यवरांची भाषणे

धर्मकार्य करतांना प्रशंसकांचे अडथळे आल्यास साधनेचे चिंतन वाढवा ! – पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, गोंदिया

पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज, अध्यक्ष, महात्यागी सेवा संस्थान, गोंदिया

अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या समारोपाच्या शुभवेळी तेवढेच सतर्क रहाणे आवश्यक आहे. धर्माची स्थापना करतांना आसुरी शक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अडथळे आणतात. सर्वांनी किमान नामजप केल्यास वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र पहाण्याची संधी आपल्याला मिळेल. धर्मकार्य करतांना प्रशंसकांचे अडथळे आल्यावर त्यात अडकून पडल्यास हिंदु राष्ट्राच्या सूत्रापासून आपण दूर जाऊ. असे अडथळे आल्यावर भजन आणि चिंतन वाढवा. यामुळे आपल्याला बळ मिळेल.

एकत्र येऊन हिंदु राष्ट्र आणण्याची केवळ चर्चा न करता संघटन करणे आवश्यक आहे. आपण गोव्याच्या पवित्र तपोभूमीत असल्याने आपल्या मनात पवित्र विचार येत आहेत. येथून आपापल्या क्षेत्रात गेल्यावर त्याच ध्येयाने कार्यरत रहायचे आहे. हनुमानसारखे संघटक बना. लक्ष्य समोर ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण करत रहा. सद्गुरु आपल्या समवेत आहेत आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नियोजनही आहे. आपल्याला केवळ कृतीशील रहायचे आहे. इतरत्र न पहाता उद्देशाच्या दिशेने कार्यरत रहा.

हिंदु राष्ट्र अधिवेशनाप्रमाणे एकोप्याचे वातावरण भारतभरात निर्माण व्हावे ! – पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज

मी कुंभमेळ्यात १ मास २० दिवस होतो. तेथे गेल्यावर जसे अन्य कशाची जाणीव नसते, तसे अधिवेशनात आल्यावर ‘कोणता दिवस आहे’, याची जाणीव नव्हती. अधिवेशनात निर्माण झालेले वातावरण पूर्ण भारतभरात निर्माण व्हावे. ज्यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले, त्या संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यात मी तन-मन-धनाने तुमच्या समवेत आहे. केवळ पुस्तकात वाचलेला एकमेकांप्रतीचा प्रेमभाव मी येथे प्रत्यक्षात अनुभवला.

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला नाही, तर वर्ष २०२९ नंतर हिंदु पंतप्रधान होईल कि नाही, हे सांगता येत नाही ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, पुणे

हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, पुणे

या देशात कायदे केवळ हिंदूंसाठी आहेत. भारतात अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण हिंदूंहून अधिक आहे. सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला नाही, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या घटेल. या वेळी बहुमताने केंद्र सरकार सत्तेत आले; परंतु वर्ष २०२९ नंतर हिंदु पंतप्रधान होईल कि नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल, असे प्रतिपादन हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी केले. ते अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे समारोपीय भाषण करतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले,

१. ‘‘मागील ५ वर्षांत काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू स्थायिक होऊ शकले नाहीत.

२. येणार्‍या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रयत्न अन् परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प यांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे.

३. नववधूला जसे तिच्या माहेरी जाण्याची ओढ असते, तशी आम्हालाही गोव्याच्या रामनाथी आश्रमात येण्याची ओढ असते.

४. हिंदु राष्ट्र अधिवेशन हाही एक लहान कुंभमेळाच आहे.

५. सर्वधर्मसमभाव हे ढोंग आहे. येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राची स्थापना करायची, असा संकल्प घेऊनच येथून जायचे आहे.’’
भाजपचे तेलंगण येथील आमदार टी. राजासिंह यांच्याविषयी ह.भ.प. श्याम महाराज राठोड म्हणाले, ‘‘आमदार श्री. टी. राजासिंह हे स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शृृंखलेतील आहेत.’’

हिंदु राष्ट्रासाठी लढणार्‍या सक्षम हिंदूंचे संघटन आवश्यक ! – भाजप आमदार, टी. राजासिंह, तेलंगण

भाजप आमदार, टी. राजासिंह, तेलंगण

देशद्रोही धर्मांध, ख्रिस्ती आणि धर्मनिरपेक्षतावादी हे हिंदु राष्ट्रवादी हिंदूंचे शत्रू आहेत. त्यांना हिंदु राष्ट्राची धास्ती वाटत आहे आणि भारताला इस्लामी राष्ट्र घोषित करण्यासाठी त्यांचे नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी १२ लाख धर्मांधांना प्रशिक्षण देऊन त्यांची एक सेना सिद्ध करण्याचे प्रयत्न चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्याकडून हिंदूंवर प्रहार झाला, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनीही सक्षम व्हावे. त्यासाठी धर्मासाठी त्याग करण्याची भावना निर्माण व्हायला हवी. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आता वेळ अल्प आहे. हिंदूंनी निर्भय होऊन हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष करण्याची सिद्धता करायला हवी. साधनेचे बळ वाढवायला हवे; कारण भक्तीमध्ये शक्ती आहे.

हिंदूंना काँग्रेसच्या काळातही संघर्ष करावा लागला आणि आता भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या काळातही संघर्ष करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले; म्हणजे ‘हिंदु सुरक्षित झाले’, असे नाही. भारताला अखंड हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी हिंदूंनी भाजपच्या सरकारवर दबाव टाकायला हवा.

श्री. टी. राजासिंह यांचा धर्माभिमान दर्शवणारी अन्य प्रेरणादायी वक्तव्ये

  • ‘धर्मवीर संभाजी महाराजांप्रमाणे धर्मरक्षणासाठी मला मरण यावे’, अशी माझी इच्छा आहे.
  • त्यागाची भावना हिंदूंमध्ये निर्माण व्हायला हवी.
  • खर्‍या साधूसंतांचे दर्शन आणि मार्गदर्शन मिळणे दुर्मिळ आहे. या अधिवेशनामध्ये साधूसंतांकडून आपल्याला अमृत मिळत आहे. हे अमृत आपापल्या राज्यांतही वाटा. (अमृत म्हणजे ‘धर्मज्ञान’, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ असे म्हणायचे आहे.)

क्षणचित्रे

१. सत्राच्या प्रारंभी सद्गुरु सत्यवान कदम यांनी पुणे येथील ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांचा सन्मान केला.

२. अधिवेशन संपल्यानंतर धर्मप्रेमींनी स्वत:हून आसंद्या एकत्र करून ठेवल्या.

हिंदु राष्ट्राच्या जयघोषांनी सभागृह दुमदुमले !

अधिवेशनानंतर ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘वन्दे मातरम्’, ‘लाना होगा लाना होगा, हिन्दू राष्ट्र लाना होगा ।’, ‘बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘सीयावर श्रीरामचंद्र की जय’, ‘कौन चले रे कौन चले, हिन्दु राष्ट्र के वीर चले’, यासारख्या असंख्य घोषणांनी सभागृह दुमदुमले.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समिती

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​