अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’स उत्साहात प्रारंभ

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यासाठी गुणसंवर्धन आणि कौशल्यविकास करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

अधिवेशनाचे उद्घाटन करताना डावीकडून सनातन संस्था चे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा, सद्गुरु नंदकुमार जाधव, पू. अशोक पात्रीकर आणि सद्गुरु सत्यवान कदम

रामनाथी (गोवा) : येणार्‍या काळात हिंदूंचे संघटनेचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. हे करतांना समविचारी राष्ट्र-धर्मप्रेमी आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संघटन प्राधान्याने करायचे आहे; कारण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत हेच हिंदू प्रत्यक्ष योगदान देणार आहेत. बर्‍याच वेळी हिंदुत्वनिष्ठ भावनेपोटी कार्य करतात. भावनेपोटी केलेले कार्य परिणामकारक नसते. त्यामुळे धर्मकार्यात अडचणी निर्माण होण्याचा धोका असतो; म्हणून हे धर्मकार्य विचारपूर्वक, दायित्वाने आणि साधनेचे अधिष्ठान ठेवून करण्याची आवश्यकता आहे. तरी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यासाठी गुणसंवर्धन आणि कौशल्यविकास करून प्रभावी ‘हिंदु राष्ट्र संघटक’ बना, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते 5 जून या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी ‘हिंदु राष्ट्र संघटकांच्या कार्याची दिशा’ या विषयावर बोलत होते. 4 दिवस चालणार्या या अधिवेशनासाठी देशभरातून 236 धर्मप्रेमी उपस्थित आहेत.

उत्स्फूर्तपणे घोषणा देताना धर्मप्रेमी

बहुसंख्य हिंदूंना सन्मानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘800 वर्षे लढा दिल्यानंतरही धर्मांध  हे आसाम जिंकू शकले नाहीत; याउलट स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा वापर करून निम्म्यापेक्षा अधिक आसामवर धर्मांधांनी ताबा मिळवला आहे आणि ते आज ‘ग्रँड बांगलादेश’ निर्माण करू पहात आहेत. हिंदु राष्ट्र ही वेदकाळापासून असलेली भारताची सर्वांत प्राचीन संकल्पना आहे; मात्र वर्ष 1947 नंतर राष्ट्र या संकल्पनेला षड्यंत्रपूर्वक भारतियांच्या मनातून पुसण्याचा प्रयत्न झाला. ‘सेक्युलर’ व्यवस्थेत राष्ट्राचा प्राचीन इतिहास नाकारला जात आहे. बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या देशात ‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे हिंदूंनाच दुय्यम दर्जा दिला जात आहे. देशातील अल्पसंख्यांकांसाठी अल्पसंख्यांक मंत्रालय असून त्यांच्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आहे. याउलट या देशातील बहुसंख्य हिंदूंसाठी मंत्रालयही नाही अन् अर्थसंकल्पही नाही. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना सन्मानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !’’
अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण केले. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. या वेळी हिंदु राष्ट्राच्या विषयाचा व्यापक स्तरावर प्रचार करण्यासाठी काय करावे, हिंदु राष्ट्र जागृती सभांचा संक्षिप्त वार्षिक आढावा, फलनिष्पत्ती, धर्मप्रेमींद्वारे केलेल्या प्रयत्नांचे अनुभवकथन, तसेच अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​