अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा समारोपीय दिवस

काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नाही, तर इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवण्यासाठी ! – अनुराग पांडे, संयोजक, इंडिया विथ विज्डम, वाराणसी (उत्तरप्रदेश)

अनुराग पांडे, संयोजक, इंडिया विथ विज्डम, वाराणसी (उत्तरप्रदेश)

इतिहासाचा अभ्यास केला, तर असे लक्षात येते की, महंमद अली जीना आणि नेहरू यांची कार्यशैली एकच होती. ही कार्यशैली होती, भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची ! हिंदूंचे अस्तित्व संपवण्यासाठी इंग्रजांनी काँग्रेसच्या माध्यमातून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ‘वर्ष १८८५ मध्ये ए.ओ. ह्युम यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात काँग्रेसची स्थापना केली’, असे सांगितले जाते. ते चुकीचे आहे. ‘फोडा आणि झोडा’ हे इंग्रजांचे धोरण राबवण्यासाठी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली आणि जातीपातीचे राजकारण करून वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन केले. काँग्रेसच्या या धोरणांमुळेच राष्ट्रभक्त लोक काँग्रेसपासून दूर गेले.

श्री. अनुराग पांडे यांनी मांडलेली अन्य सूत्रे

  • काही वर्षांपूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीने ‘केंद्रीय लक्ष्यित हिंसा कायदा’ पारित केला होता. ‘दंगल झाल्यास अल्पसंख्य समाज गर्दीचा भाग रहाणार नाहीत’, असे प्रावधान त्यामध्ये होते. या माध्यमातून हिंदुत्व दडपण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र होते; पण त्या विधेयकाला झालेल्या विरोधामुळे पारित होऊ शकले नाही.
  • गेल्या ७० वर्षांत भारतात ‘विविधतेत एकता’ असल्याचे सांगितले जाते; पण वस्तुस्थिती अशी आहे की, आज भारतीय समाज प्रांतवादाच्या लढाईत अडकला आहे.

हिंदुत्वाचे नाव घेणारे राजकीय पक्ष धर्माचे प्रत्यक्ष कार्य करतांना मात्र डरपोकपणा दाखवतात ! – जितेंद्र सिंह ठाकूर, अखिल भारत हिंदु महासभा, मध्यप्रदेश

जितेंद्र सिंह ठाकूर, अखिल भारत हिंदु महासभा, मध्यप्रदेश

हिंदुत्वाचे नाव घेणारे राजकीय पक्ष धर्माचे प्रत्यक्ष कार्य करतांना मात्र डरपोकपणा दाखवतात, हा अनुभव आहे. संध्या लंडनमध्ये असलेली धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेतील मूळ मूर्ती परत आणून ठेवण्याचे भाजपने आश्‍वासन दिले होते; पण अद्याप ते पूर्ण झाले नाही. भाजपच्या कार्यकाळात भोजशाळेत सरस्वतीपूजन करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करण्यात आला; मात्र नमाज पढायला मोकळीक दिली गेली. त्यांच्याच काळात लव्ह जिहाद, गोहत्या यांचे प्रमाण वाढले; पण आम्ही या अधिवेशनाच्या निमित्ताने असा विश्‍वास देतो की, मध्यप्रदेशमध्ये कोणतेही धर्मविरोधी कार्य झाले, तरी त्याला विरोध करू.

काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केली जाणारी टीका आणि ‘माफीवीर’ म्हणून हेटाळणी यांचा प्रतिवाद करतांना श्री. जितेंद्र सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘काँग्रेससारख्या ‘गद्दार’ लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी टीका करण्यापूर्वी इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काय वक्तव्य केले होेते, ते तरी जाणून घ्यावे. त्याचा अभ्यास न करता टीका करणे म्हणजे त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे.’’

मोदी यांनी नथुराम गोडसे यांच्याविषयी अध्ययन केले नाही का ? – जितेंद्र सिंह ठाकूर, अखिल भारत हिंदु महासभा, मध्यप्रदेश

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘नथुराम गोडसे हे देशभक्त होते’, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांनी क्षमा मागायला लावली होती. पंतप्रधान मोदी यांनी ‘मी साध्वी प्रज्ञासिंह यांना कधीही मनापासून क्षमा करू शकणार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. जितेंद्र सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘नथुराम गोडसे हे कोणी हत्यारे नाही, तर महान देशभक्त होते. त्यांनी कोणत्या परिस्थितीत गांधीवध केला, हे जनता आता जाणून घेत आहे आणि जागृत होत आहे; मात्र मोदी, भाजप आणि मोठी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी त्याचे अध्ययन केले नाही, हे दिसून येते.’’

सनातन संस्थाच हिंदु राष्ट्र आणू शकेल, याचा विश्‍वास वाटतो ! – जितेंद्र सिंह ठाकूर, अखिल भारत हिंदु महासभा, मध्यप्रदेश

सनातन संस्था राष्ट्रभक्तांचा योग्य इतिहास आणि माहिती सादर करत आहे. सनातन संस्थाच हिंदु राष्ट्र आणू शकेल, याचा विश्‍वास वाटतो. या कार्यात जे काही सहकार्य सनातन संस्थेला करावे लागेल, ते सर्व आम्ही करू.

स्वसंरक्षणाच्या पद्धती नष्ट होत चालल्या आहेत ! – श्री. प्रकाश सिंह, प्रतापगढ (उत्तरप्रदेश)

श्री. प्रकाश सिंह, प्रतापगढ (उत्तरप्रदेश)

आगामी युद्धकाळात स्वतःचे रक्षण करता येण्यासाठी स्वसंरक्षणाच्या पद्धती ठाऊक असणे आवश्यक आहे; पण लाठी चालवणे, शस्त्रास्त्र चालवणे हे प्रकार गावागावांमधून लुप्त होत चालले आहेत. व्यक्तींवर चांगले संस्कार असतील, तर या पद्धती आणि शस्त्र यांचा दुरुपयोग होऊ शकत नाही. स्वसंरक्षणासाठी सरकारसंमत शस्त्र बाळगले, तर लोकांकडून आक्षेप घेतले जातात; मात्र व्यक्तीला कमजोर करणारे भ्रमणभाष बाळगले, तर कोणी बोलत नाही. हिंदुत्वाची भावना अल्प झाल्याने, आज धर्मावर संकट आले आहे.

पाकिस्तानातून भारतात येणार्‍या शरणार्थी हिंदूंसाठी हिंदु महासभा कटीबद्ध ! – श्री. वीरेश त्यागी, कार्यालय मंत्री, हिंदु महासभा

श्री. वीरेश त्यागी, कार्यालय मंत्री, हिंदु महासभा

हिंदु महासभेचे कार्यालयमंत्री श्री. वीरेश त्यागी यांनी महासभेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर केल्या जाणार्‍या कार्याविषयी अवगत केले. ते म्हणाले, ‘‘उत्तर भारतात होणार्‍या कावड यात्रेत येणार्‍या हिंदूंना लागणार्‍या सर्व सेवा पुरवण्याचे काम हिंदु महासभा करत आहेत. येणार्‍या काळात ‘ज्या हिंदूंना अमरनाथ यात्रेला जाण्याची इच्छा आहे’, त्यांना नोंदणी करणे, आदी लागणारे सर्व सहकार्य हिंदु महासभा करेल. पाकिस्तानातून भारतात येणार्‍या शरणार्थी हिंदूंना जीवनावश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी हिंदु महासभा पुढाकार घेते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात येणार्‍या हिंदूंसाठी व्हिसाचे शुल्क ५०० रुपयांवरून एकदम अडीच सहस्र रुपये करण्यात आले. यावर आंदोलन केल्यावर ते पूर्ववत करण्यात आले.’’

लव्ह जिहादच्या घटना, तसेच पोलीस-प्रशासनाकडून धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी केली जाणारी टाळाटाळ यांचा संघटितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन श्री. त्यागी यांनी या वेळी केेले.

श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि नेपाळचे माजी राजगुरु डॉ. माधव भट्टराय यांच्या ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून अधिवेशनाला शुभेच्छा !

या वेळी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यास गोवा सरकारने अन्याय्य बंदी घातल्याने आणि नेपाळचे माजी राजगुरु डॉ. माधव भट्टराय हे अधिवेशनकाळात विदेशात असल्याने अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी अधिवेशनासाठी दिलेला संदेश ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून दाखवण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांना घडवण्याचा ऐतिहासिक संकल्प करा ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

गेल्या ७ वर्षांपासून चालू असलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात संख्यात्मक, गुणात्मक आणि वैचारिक विकास होत असल्याने हिंदूंंमध्ये संघटितभाव, विश्‍वास आणि शक्ती निर्माण होत आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. ‘आपापल्या क्षेत्रात जाऊन त्याप्रमाणे आचरण करणे’, हे आपले कर्तव्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. हिंदु राष्ट्रासाठीची सिद्धता करायची आहे. हिंदु धर्मावरील विविध आघातांना रोखण्यासाठी आपापल्या संघटनांना जागृत करणे, त्यांना गती देणे, त्यांचा विस्तार करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये क्षात्रतेज निर्माण करणे, हे आपले दायित्व आहे. हिंदु राष्ट्र निश्‍चितच येईल; पण त्यासाठी परिश्रम करणे, हे आपले कर्तव्य आहे. हिंदु राष्ट्रासाठी जगायचे, प्रसंगी प्राणही द्यायचे आहेत. या कार्यासाठी युवकांना यासाठी सिद्ध करण्याचा ऐतिहासिक संकल्प या अधिवेशनात करावा. या कार्यात ईश्‍वर आपल्या समवेत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना मोठा विजय मिळाला. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह यांचा विजय होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा विजय हा संत, हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांचा विजय आहे. त्यांच्या विजयाने ‘हिंदु आतंकवादा’च्या नावाने ओरड करणार्‍यांवर प्रहार केला आहे. ‘जिहादी आतंकवाद’ हा एकमेव आतंकवाद जगात आहे. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे. या आव्हानाला आपल्याला सामोरे जायचे आहे.

‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतात मुसलमानांची संख्या वाढून वर्ष २०५० मध्ये तो ‘इस्लामी देश’ म्हणून घोषित होईल’, अशी चेतावणी दिली आहे. या चेतावणीकडे हिंदूंनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. भारताला इस्लामी देश होण्यापासून रोखण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुसलमानांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यातील बहुपत्नीत्व कायदा रहित करण्याची मागणी मोदी सरकारकडे करायला हवी.’

भाजपच्या राज्यात हिंदु संघटनेवर बंदी घातली जाणे, हा राज्यघटनेचा अवमान ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

गोवा शासनाने बंदी घातल्याने मी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनास उपस्थित राहू शकलो नाही. गोवा राज्यावर भाजपचे राज्य असतांनाही एका हिंदु संघटनेवर एका रात्रीत प्रवेशबंदी घातली जाणे, हे दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा हा अवमान आहे.

भारत आणि नेपाळ येथे निश्‍चितच हिंदु राष्ट्र स्थापन होईल ! – डॉ. माधव भट्टराय, माजी राजगुरु, नेपाळ

‘हे अधिवेशन यशस्वी होवो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. अधिवेशनाला उपस्थित नसलो, तरी मी मनाने गोवा येथील सनातन आश्रमातच आहे. ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त जे ठराव संमत होतील, त्याला माझा पाठिंबा आहे आणि ते कृतीत आणण्यासाठी कार्यरत राहीन. सनातन हिंदु धर्म हा प्राचीन आणि वैज्ञानिक धर्म आहे. या धर्माचे मूल्य जगभरात पोचवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.

नेपाळमधील ९० ते ९५ टक्के लोक हिंदु आहेत; मात्र काही निधर्मीवाद्यांनी नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित केले आहे. ‘नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि ते करूनच दाखवू’, हा आमचा विश्‍वास आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धर्मप्रेमी यांच्यामुळे हे निश्‍चितच होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मी समवेत आहे आणि सदैव कार्यरत राहीन.’’

क्षणचित्र : श्री. प्रमोद मुतालिक आणि डॉ. माधव भट्टराय यांच्या उद्बोधनानंतर धर्मप्रेमींनी ‘एक ही लक्ष्य एक ही ध्येय हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र’, ‘हर हर महादेव’, अशा उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

हिंदु राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान’ ! – मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारतभरात अनेक हिंदु राष्ट्रप्रेमी व्यक्ती अन् संघटना कार्यरत आहेत. अशांना शोधून त्यांच्याशी संपर्क करण्याच्या दृष्टीने ‘हिंदु जनजागृती समिती’ने गेल्या वर्षी जानेवारीपासून आजपर्यंत ‘हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान’ राबवले. संघटनेच्या पलीकडे जाऊन अंतिम ध्येय, म्हणजे हिंदु राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान पुढील वर्षभर आणि भारतभर राबवण्याचे नियोजनात आहे.

आगामी काळात उद्योगपतींचे संघटन अधिक प्रभावी बनवायचे आहे ! – पू. प्रदीप खेमका, मार्गदर्शक, उद्योगपती परिषद

गोवा येथील सप्तम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘उद्योगपती परिषदे’ची परिषदेची स्थापना झाली. ‘उद्योगपती परिषदेकडून समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्याची सिद्धता असलेले देशभरातील व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योगपती यांचे कृतीशील संघटन करण्यात येत आहे. आगामी काळात उद्योगपती अभियान अधिक शक्तीशाली बनवायचे आहे. याकरता समाजात उद्योगपती संपर्क अभियान राबवून हे संघटन अधिक शक्तीशाली करायचे आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. पुढील ४ वर्षांच्या या संधीकाळात आपण हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी झालो आणि धर्मसंस्थापनेसाठी कार्य केले, तर आपली साधना होईल.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र संपर्क अभियान

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​