‘इसिस’च्या आतंकवाद्यांना ‘एम्.आय.एम्’च्या ओवैसीकडून उघड साहाय्य ! – भाजप आमदार टी. राजा सिंह, भाग्यनगर

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा समारोपीय दिवस

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून हिंदुत्वनिष्ठांनी उघड केली हिंदुत्वावरील संकटे !

भाजप आमदार टी. राजा सिंह, भाग्यनगर

रामनाथी (गोवा) : भाग्यनगर (हैद्राबाद) येथे वर्ष २००२ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत अनेक निरपराधी बळी पडले. या प्रकरणात अटक केलेल्या आतंकवाद्यांना ‘एम्आयएम्’च्या ओवैसींनी साहाय्य केले. यानंतर १ जून २०१८ मध्ये ‘इसिस’च्या १२ आतंकवाद्यांना ‘एन्आयए’ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) अटक करून त्यांनी मला आणि श्री भाग्यलक्ष्मी मंदिराला लक्ष्य करून आक्रमण करण्याचा कट उधळला. त्या वेळी ‘एन्आयएने पकडलेल्या या सर्व आतंकवाद्यांना आम्ही साहाय्य करू’, असे औवेसी यांनी घोषित केले. अशा प्रकारे ओवैसी उघडपणे आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंचे प्रभावी संघटन आम्ही उभे केले. पूर्वी तेलंगण राज्यात उघडपणे गोमातेची हत्या केली जात होती. आमचे कार्य चालू झाल्यामुळे बकरी ईदच्या पूर्वी पोलीस प्रशासन स्वत:हून कार्यरत होते आणि सीमेवरच गस्त घालणे, गोतस्करांना कह्यात घेणे, अशा कृती करते. ही हिंदूंच्या संघटनाची शक्ती असून ‘इतिहासाने आपल्याला लक्षात ठेवावे, असे हिंदुत्वाचे कार्य करा, असे आवाहन तेलंगण येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ४ जून या दिवशी ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना झालेला विरोध आणि त्याला केलेला प्रतिकार’ या विषयावर बोलत होते.

या वेळी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता किरण बेट्टादापूर, मध्यप्रदेश येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्र सिंह ठाकूर, प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथील श्री. प्रकाश सिंह, वाराणसी येथील ‘इंडिया विथ विज्डम ग्रुप’चे संयोजक श्री. अनुराग पांडे, हिंदु महासभेचे कार्यालयमंत्री श्री. वीरेश त्यागी, उद्योगपती परिषदेेचे मार्गदर्शक पू. प्रदीप खेमका, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये आणि समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

टी. राजासिंह यांच्या मार्गदर्शनातील उद्बोधक सूत्रे

१. वर्ष २०१९ मध्ये तेलंगणमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मी एकमेव उमेदवार निवडून आलो. ईश्‍वराच्या आशीर्वादामुळे मी निवडणूक जिंकलो. जो धर्मकार्य करतो, त्याच्या पाठीशी ईश्‍वराचा आशीर्वाद असतोच. ‘जो धर्माचे कार्य करतो, त्याचे स्वतः धर्म रक्षण करतो’, हे मी अनुभवतो.

२. गाय वाचली, तरच देश वाचेल. पूर्वी आम्ही अतिशय खडतर परिस्थितीत गोरक्षणाचे कार्य केले आहे. गोरक्षण करतांना वाहनांचा पाठलाग करण्यासाठी जातांना आमच्या गाड्यांत पेट्रोल भरण्यासाठी पैसेही नसायचे. पेट्रोल व्यय व्हायला नको’; म्हणून उतारांवरून आम्ही गाड्या बंद करून चालवायचो. गोरक्षणाचे कार्य करतांना अनेकदा धर्मांधांकडून आमच्यावर प्राणघातक आक्रमणे झाली. त्यांचा प्रतिकार करायला आम्हाला जमायचे नाही. हे लक्षात आल्यावर आम्हीही प्रशिक्षण घेऊन सक्षम झालो. प्राण हातावर घेऊन प्रभावीपणे गोरक्षणाचे कार्य करत आहोत. आता अशी स्थिती आहे की, ईदच्या वेळी गोहत्या होऊ नये; म्हणून पोलीस-प्रशासन स्वतःच प्रयत्न करते. तेलंगणमध्ये विविध राज्यांतून जे प्रमुख महामार्ग येतात, त्या ठिकाणी तपासणीनाकी उभी करून तेथून वाहनांमधून अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई केली जाते.

३. १०० कोटी असूनही आज हिंदू असुरक्षित आहेत. त्यासाठीच हिंदु रा?ष्ट्राची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर उद्या कपाळावर टिळा लावणे, मंदिरात जाणे यांसारख्या कृती करणेही अवघड होईल.

टी. राजासिंह यांच्याप्रमाणे किती आमदार साधना करण्याचे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचे आवाहन करतात ?

‘हिंदु राष्ट्राचे कार्य करायला मिळणे’, हे महद्भाग्य ! – टी. राजासिंह

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय ठेवून हिंदु जनजागृती समिती कार्यरत आहे. ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल,’ ही गुरुवाणी आहे. प्रत्यकाने हिंदु राष्ट्राचाच विचार ठेवून प्रयत्न करायला हवेत. धर्माचे कार्य करणार्‍यांनाच इतिहास लक्षात ठेवतो. धर्मरक्षणाचे कार्य करणारे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आजही लक्षात आहेत. आपण पुष्कळ भाग्यवान आहोत की, नियतीने आपल्या कपाळावर ‘तू धर्मकार्य करायचेे आहेस’, असे लिहिले आहे. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायला मिळणे, हे महद्भाग्य आहे. आपण या अधिवेशनाला प्रत्यक्ष भगवंताच्या माध्यमातून उपस्थित राहू शकलो आहोत. जो धर्माचे काम करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. भक्तीमध्ये शक्ती आहे. साधना करा आणि ईश्‍वराला हाक मारा. तो तुमच्या रक्षणासाठी धावून येईल.

मंदिरांची लूट थांबण्यासाठी मंदिरांना शासनाच्या कह्यातून मुक्त करणे अत्यावश्यक ! – अधिवक्ता किरण बेट्टादापूर, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता किरण बेट्टादापूर, सर्वोच्च न्यायालय

भारत स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले नाही. मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. देशातील साडेचार लक्ष मंदिरे सरकारच्या कह्यात असून त्यात किती प्रमाणात भ्रष्टाचार असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कोळसा घोटाळा जर १ लक्ष ८० सहस्र कोटी रुपयांचा असेल, तर मंदिरांतील भ्रष्टाचार त्याही पेक्षा कितीतरी अधिक पटींनी असणार आहे. ‘मंदिरांतील घोटाळा’ हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ‘केवळ कर्नाटक राज्याचा विचार केल्यास कर्नाटक सरकार ३५ सहस्र मंदिरांपासून १० सहस्र कोटी रुपये गोळा करते; मात्र त्यातील बहुतांश खर्च हा चर्च, पूरनिधी अशाप्रकारच्या हिंदूंशी संबंध नसलेल्या गोष्टींसाठी खर्च करते. गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य…’ या श्‍लोकातून प्रेरणा घेऊन स्वत:पासूनच धर्मकार्यासाठी प्रारंभ केला पाहिजे.’
अधिवक्ता किरण बेट्टादापूर यांनी मांडलेली अन्य उद्बोधक सूत्रे

१. केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि आदिकेशव पेरूमल मंदिर त्रावणकोर राजांकडून चालवले जायचे. वर्ष १९५९-६० मध्ये तमिळनाडू सरकारने मंदिरांचे व्यवस्थापन पहाण्यास आरंभ केला आणि मंदिराची संपत्ती मोजली. तेव्हा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात धन अर्पण केल्याचे लक्षात आले. या मंदिरातील २ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडून हडप केली गेली. एका मंदिरातील एवढी संपत्ती लुटली जात असेल, तर भारतभरातील साडेचार लाख मंदिरांतून आतापर्यंत किती संपत्ती लुटली गेली असेल, याची कल्पना येते.

२. तमिळनाडूमधील ५ लाख एकर भूमी मंदिरांची आहे. ती ‘लीज’वर देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भूमीचे बाजारमूल्य १० सहस्र कोटी रुपये प्रतिवर्षी मिळाले असते, तेथे आता केवळ २०० ते ३०० कोटी रुपये मिळत आहेत.

३. वर्ष १९५९ मध्ये सी.पी. रामस्वामी अय्यर कमिशनने २ वर्षे अध्ययन करून, तसेच देशभरातील ३ सहस्र साधूसंतांशी चर्चा करून ‘मंदिरे आणि धार्मिक संस्था यांचे व्यवस्थापन कसे असावे’, याचा एक सविस्तर अहवाल सादर केला होता; मात्र या अहवालात करण्यात आलेल्या एकाही सूचनेवरून कारवाई करण्यात आली नाही.

४. युरोपमध्ये ‘सेक्युलर’ हा शब्द ‘धार्मिक गोष्टींमधून सरकारचा हस्तक्षेप वगळणे’ या दृष्टीने वापरला जातो; मात्र भारत सरकार अन्य धर्मियांच्या लाभासाठी हिंदु धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत. ‘हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये’, यासाठी आम्ही न्यायालयात याचिका केली आहे. मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होेत नाहीत, तोपर्यंत आपण स्वतंत्र नाहीत. भारत स्वतंत्र झाला असला, तरी सनातन धर्माच्या दृष्टीने आपण पूर्ण स्वतंत्र नाही. त्यासाठी संपूर्ण ‘स्वराज्या’ची आवश्यकता आहे.

५. भगवद्गीतेत ‘धर्माच्या संस्थापनेसाठी ईश्‍वर अवतार घेतो’, असे म्हटले आहे. ईश्‍वराने धर्माच्या संस्थापनेसाठी येण्यापेक्षा आपणच स्वत:तील देवत्व जागृत करून लढायला हवे.

मध्यप्रदेश येथे हिंदूसंघटनाचे कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे योगेश व्हनमारे !

मध्यप्रदेशमध्ये हिंदूसंघटनाचे कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे योगेश व्हनमारे यांचे १५ डिसेंबर २०१८ ला आकस्मिक निधन झाले. मध्यप्रदेशमध्ये कार्य करतांना त्यांनी तेथे हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या संघटनांशी जवळीक साधून त्यांच्यातही संघटितभाव निर्माण केला होता. योगेश व्हनमारे यांनी मध्यप्रदेशमध्ये केलेल्या कार्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी दिली. या वेळी योगेश व्हनमारे यांचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला मुलगा कु. देवदत्त व्हनमारे (वय १३ वर्षे) याची या अधिवेशनामध्ये ओळख करून देण्यात आली.

योगेश व्हनमारे यांच्याविषयी जितेंद्र ठाकूर यांनी काढलेले कौतुकोद्वार !

जितेंद्र ठाकूर

१. हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील कार्यकर्त्यांमध्ये कौशल्यविकास करणे : सनातनच्या कार्याच्या प्रसार करण्यासाठी योगेश व्हनमारे जेव्हा मध्यप्रदेशात आले, तेव्हा ते पुष्कळ साधे होते. एवढे साधे रहाणीमान असणारी व्यक्ती हिंदूसंघटनाचे मोठे कार्य करेल, असे तेव्हा वाटले नव्हते. योगेश व्हनमारे यांनी मध्यप्रदेशातील संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या गुणांची न्यूनता होती, ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला.

२. धर्मकार्यासाठी समर्पण करणारा मित्र : योगेशजी माझ्या कुुटुंबातील सदस्याप्रमाणे आणि मला मोठ्या भावाप्रमाणे होेते. त्यांच्या निधनानंतर २-३ दिवस माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आपले अनेक प्रकारचे मित्र असतात; पण धर्मकार्यासाठी समर्पण करणारा हा निराळा मित्र होता.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा : योगेश व्हनमारे यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा होती. साधनेचे प्रयत्न करतांना त्यांना पाहिल्यावर ते संत असल्याप्रमाणे वाटायचे. एकदा एका सभेत बोलतांना व्यासपिठावरच त्यांच्या डोळ्यांतूून अश्रू वाहू लागले. त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हे कार्य परात्पर गुरु डॉक्टरच करवून घेत आहेत.’’

४. धर्मकार्यासाठी कुटुंबाचे समर्पण : योगेश व्हनमारे यांंची पत्नीही धर्मकार्य करत होती. स्वत:सह कुटुंबालाही धर्मकार्यासाठी समर्पित करणे सामान्य व्यक्तीसाठी अशक्यच आहे.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समिती

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​