हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हिंदू संघटनांची आंदोलने अन् निवेदने

कल्याण

सामाजिक प्रसारमाध्यमे आणि आंदोलन या माध्यमांतून अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध करा ! – कैलास जाधव, हिंदु राष्ट्र सेना

कल्याण : अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अनेक वर्षे हिंदु समाजाची नि:स्वार्थ भावाने सेवा केली आहे. अशी व्यक्ती कधी चुकीचे कृत्य करू शकत नाही. अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करून केंद्रीय अन्वेषण विभागाने एकप्रकारे हिंदुत्वाला उघड आव्हान दिले आहे, असे आम्ही समजतो. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, तसेच आंदोलन यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेचा निषेध करावा, तसेच त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभे राहून त्यांना साहाय्य करावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव यांनी कल्याण येथे २९ मे या दिवशी आंदोलनात केले. या आंदोलनात महामंडलेश्‍वर संघटन, अखंड हिंदु संघटन, बजरंग दल, भाजप, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य काही संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता हिंदू कदापी सहन करणार नाहीत !  – आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

हिंदु समाजाला दाबून टाकू वा हिंदु समाज हा अन्याय मुकाट्याने सहन करेल, या भ्रमात केंद्रीय अन्वेषण विभागाने आणि पुरोगामी यांनी राहू नये. हिंदूंची शक्ती आता जागृत झालेली आहे. हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता हिंदू कदापी सहन करणार नाहीत, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

अधिवक्ता पुनाळेकर यांची अटक समस्त हिंदुत्वनिष्ठांना खटकणारी आहे ! – आशिष पांण्डेय

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्याचा खटला असो, त्यासाठी निःस्वार्थ आणि नि:शुल्कपणे साहाय्य करून त्याला न्याय मिळेपर्यंत त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे रहाणारे अधिवक्ता म्हणून संजीव पुनाळेकर यांची ओळख आहे. त्यांना झालेली अटक ही समस्त हिंदुत्वनिष्ठांना खटकणारी आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे वागणे हिंदुत्वनिष्ठांवर दबावतंत्र निर्माण करणारे ! – विजय ठाकरे, पत्रकार

अधिवक्ता माजिद मेमन हे आतंकवाद्यांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना खासदारकी दिली जाते; पण हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडणार्‍या अधिवक्त्यांना अटक केली जाते. ही कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाचे वागणे, हे संशयास्पद आणि हिंदुत्वनिष्ठांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे.

नागपूर

पुनाळेकर आणि भावे निर्दोष सुटेपर्यंत आमचा लढा चालू राहील ! – अतुल अर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती

दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’चा तपास हा दिशाहीन झाला असून सत्य लवकरच बाहेर येईल. अधिवक्ता पुनाळेकर यांना केलेली अटक हे एक पद्धतशीर षड्यंत्र आहे. हिंदुत्वाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्‍यांवर दबाव आणला जात आहे. अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे निर्दोष सुटेपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील. त्यांची त्वरित मुक्तता करा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे अतुल अर्वेन्ला यांनी नागपूर येथे केली. २८ मे या दिवशी संविधान चौक, नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

सानपाडा

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचले गेले आहे ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक वैद्य उदय धुरी

नवी मुंबई : अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे सतत समाजहितासाठी कार्यरत आहेत. सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्या कार्यप्रणालीविरुद्ध त्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे हे षड्यंत्र रचले गेले आहे. सीबीआय दाभोलकर प्रकरणात न्यायालयाचीही फसवणूक करत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी केले. २८ मे या दिवशी सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या आंदोलनात ते बोलत होते.

‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा’, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या वेळी केली. या वेळी शिवसेनेचे नंदकिशोर गोसावी, हिंदु राष्ट्र सेनेचे भालचंद्र गायकवाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते. धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत आणि फलक हातात घेऊन या अन्याय्य अटकेचा निषेध केला. या वेळी शासनाला देण्याच्या निवेदनावर शेकडो नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या.

ठाणे महसूल विभागाचे तहसीलदार विकास पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवेदन स्वीकारले. त्यांनी ‘आपल्या भावना संबंधित विभागापर्यंत पोचवून जिल्हाधिकार्‍यांना सांगतो’, असे सांगितले.

डावीकडून भाजप आमदार संजय केळकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. घाणेकर, विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. अनिल मोरे, समितीच्या सौ. सविता लेले यांनी दिलेले निवेदन स्वीकारले.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आमदार श्री. महेश चौगुले यांना हिंदुत्वनिष्ठांनी भेटून निवेदन दिले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवेदन स्वीकारल्यावर ‘सरकार आपले असल्याने निश्‍चित लाभ होईल. मी तुमचे म्हणणे आणि भावना पुढे पोचवतो’, असे  सांगितले. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. अनिल मोरे उपस्थित होते.

Related Tags

बजरंग दलभाजपाराष्ट्रीयराष्ट्रीय हिंदु आंदोलनसनातन संस्थासमितीकडून निवेदनहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र सेनाहिंदु विधिज्ञ परिषदहिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​