२७ मे पासून गोव्यात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन : हिंदु जनजागृती समिती

  • विश्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या संकल्पासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट !

  • वाराणसी येथील पत्रकार परिषदेत माहिती

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. गुरुराज प्रभु, अधिवक्ता अवनीश राय, बोलतांना पू. नीलेश सिंगबाळ आणि अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी

वाराणसी : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ‘केंद्रामध्ये येणारे सरकार हे हिंदुहिताचा विचार करणारे असेल कि ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचे समर्थन करणारे असेल ?’, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. अशा वेळी देशातील हिंदूंना सर्वच क्षेत्रांत सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी २७ मे ते ४ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ही पत्रकार परिषद वाराणसीमधील मैदागिन येथील पराडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या वेळी ‘इंडिया विथ विसडम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, ‘नागरिक उत्थान सेवा समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय आणि सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु हे उपस्थित होते.

देश-विदेशांतील २०० हून अधिक संघटनांचे ८०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार !

पू. नीलेश सिंगबाळ पुढे म्हणाले, ‘‘यंदाच्या या अधिवेशनाला भारतातील १९ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ८०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. गेल्या ७ वर्षांतील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशनां’मुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्र’, या संकल्पनेविषयी मोठी जागृती झाली आहे.’’

हिंदु अधिवक्ता आणि उद्योगपती अधिवेशन

‘इंडिया विथ विसडम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे २७ आणि २८ मे या दिवशी ‘हिंदु अधिवक्ता अधिवेशन’ होणार आहे. या समवेतच २८ मे या दिवशी प्रथम एक दिवसीय ‘उद्योगपती अधिवेशना’चेही आयोजन अधिवेशनाच्या मुख्य स्थळी करण्यात आले आहे.

‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशन सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु यांनी सांगितले की, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ७ जून या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे.

गुरुराज प्रभु पुढे म्हणाले की, गेल्या ७ राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये निश्चित केल्यानुसार वाराणसी आणि उत्तरप्रदेशातील अन्य ठिकाणी स्थानिक समस्यांवर अनेक आंदोलन करण्यासह उपक्रम राबवण्यात आले. प्रामुख्याने प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर या वर्षी झालेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी जनजागृती करणारे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून २ लाखांहून अधिक भाविकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा विषय समजून घेतला. त्यातील १ सहस्र ७०० लोकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. २०० हून अधिक साधू आणि संत यांनी प्रदर्शनस्थळाला भेट देऊन आशीर्वाद दिले. ५० हिंदु राष्ट्रप्रेमी संतांनी या कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ८ फेब्रुवारीला समविचारी संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यासाठी ‘एक दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते.

पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले की, कुंभमेळ्याच्या पूर्वी २१ ते २४ नोव्हेेंबर २०१८ या कालावधीमध्ये वाराणसीच्या आशापूरमधील ‘मधुवन लॉन’मध्ये उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदु अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करण्याच्या हेतूने आयोजित केलेले हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडले. हिंदु संघटनाच्या कार्याला गती देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अष्टम अर्थात् आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे.

संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमे यांवरून थेट प्रक्षेपण

जगभरातील हिंदुत्वनिष्ठांसाठी या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे ‘YouTube Channel : Hindu Janajagruti Samiti’, ‘Facebook page : /HinduAdhiveshan’ आणि ‘Twitter : @HinduJagrutiOrg’ या माध्यमांतून थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पू. नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी केले.

यंदाच्या अधिवेशनात प्रथमच ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतील धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजन

‘नागरिक उत्थान सेवा समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय यांनी सांगितले, ‘सोशल मीडिया’चे (सामाजिक माध्यमांचे) महत्त्व लक्षात घेता या क्षेत्रातील धर्मनिष्ठ हिंदु कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्यासाठी पहिल्या एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतील धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजनही करण्यात आले आहे. ही ‘कॉन्क्लेव्ह’ रविवार, २ जून या दिवशी अधिवेशनाच्या मुख्य स्थळी असणार आहे.

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्ष

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​