-
मुसलमान व्यक्तीचे बूट चाटायला लावले !
-
पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे आणि अनिरुद्ध सोनवणे यांच्याकडून मारहाण !
- आझाद मैदानातील दंगलीसारख्या घटनांत धर्मांधांकडून मुकाट्याने मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! असे हिंदुद्वेषी पोलीस जेव्हा धर्मांधांकडून मार खात असतील, तेव्हा अशा पोलिसांना वाचवावेसे हिंदूंना वाटेल का ?
- पोलिसांनी अशी मारहाण एखाद्या अन्य पंथीय व्यक्तीला केली असती, तर एव्हना पुरोगामी टोळी सरकारवर तुटून पडली असती. आता ही टोळी गप्प का ?
पुणे : खडकी पोलिसांनी एका क्षुल्लक कारणावरून श्री. मयूर खोले या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करून एका मुसलमान व्यक्तीचे बूट चाटायला लावल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला. याविषयी श्री. मयूर यांचे वडील श्री. सुरेश खोले यांनी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रारअर्ज प्रविष्ट केला आहे. या तक्रारीची प्रत पुणे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री यांना पाठवली आहे. सध्या श्री. मयूर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ‘समर्थ हॉस्पिटल’मध्ये उपचार चालू आहेत. (बेकायदेशीरपणे, तसेच अमानुष वागणूक देणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? असे पोलीस जनतेचे रक्षक नसून भक्षकच आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,
‘पाटील इस्टेट वसाहती’त ८ एप्रिलला क्षुल्लक कारणांवरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मुसलमान समाज एकत्र जमून काही अनुचित प्रकार करण्याच्या सिद्धतेत असल्यावरून त्या भागातील हिंदुत्वनिष्ठही संघटित होत होते.
१. हिंदुत्वनिष्ठ श्री. मयूर खोले यांनी याविषयी ‘व्हॉट्सअॅप’वरून हिंदूंनी जवळच्या एका मंदिरात संघटित होण्याचे आवाहन केले.
२. या संदेशाच्या आधारे पोलीस कर्मचारी देवकर यांनी श्री. मयूर यांना दुपारी कह्यात घेऊन मरिआई गेट पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत बसवून ठेवले. ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे आणि अनिरुद्ध सोनवणे यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मयूर यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत लाकडी दंडुक्याने अमानुष मारहाण केली.
३. श्री. मयूर खोले यांच्या डोक्यावरील केस उपटून त्यांना एका मुसलमान व्यक्तीच्या बुटांचा ४ वेळा वास घेऊन ते चाटायला लावले.
४. ‘रुग्णालयाच्या वतीने वारंवार दूरध्वनी करूनही जबाब नोंदवण्यासाठी कोणीही पोलीस येत नाही आणि आले तरी जबाब लिहून घेत नाही’, असे श्री. सुरेश खोले यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
५. या संदर्भात खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ यांनी पोलिसांवर मुद्दामहून चुकीचे आरोप केले जात असल्याचे सांगितले. याविषयी ‘श्री. खोले यांचा तक्रारअर्ज मिळाला असून चौकशी करून त्यात काही निष्पन्न झाले, तर कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.
हिंदूंनो, संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करा. पोलिसांविषयी असे अनुभव आल्यास त्याची माहिती त्वरित जवळच्या दैनिक कार्यालयात पाठवावी !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात